१७ प्रतिष्ठीत जुगाऱ्यांना अटक

0
2735

पारनेर पोलिसांची ढवळपूरी व अळकुटी येथे धडक कारवाई

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

तालुक्यातील ढवळपूरी व अळकुटी येथे जुगार खेळणाऱ्या एकूण १७ जुगाऱ्यांना पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७५ हजार ५९० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

यासंदर्भात पारनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार ढवळपूरी ते कुटेवाडी रस्त्यावरील शिवांमृत हॉटेलमध्ये जुगाराचा क्लब सुरू असल्याची माहीती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना मिळाली होती. त्यांनी रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे यांच्यासह तेथे छापा टाकला असता सचिन ज्ञानेश्‍वर भिंगारकर (वय ३८ रा. गौरीघुमट, नालेगांव अ. नगर), विकास सिताराम आव्हाड (वय ४० रा. पटवर्धन चौक, अ. नगर), राहुल चंद्रकांत थोरात (वय २२ रा. ढवळपूरी), दिलीप भागचंद शर्मा (वय ५२ रा. पाईपलाईन रस्ता, नगर), काशिनाथ बबन शिंदे (वय ३३ रा. वैदूवाडी, पाईपलाईन रस्ता, नगर,) बाळू सुर्यभान तागड (वय ३३ रा. पाईपलाईन रस्ता, नगर), उमेश विठोबा सातकर (वय ३५ रा. गाजदीपूर ता. पारनेर), शरद दुर्याधन केदारी (वय ३१ रा. वनकुटे, ता. पारनेर), म्हसू गोवर्धन पवार (वय ४५ रा. लालूचा तांडा, ढवळपूरी), संदीप वाव्हळशिवाजी मिसाळ यांना तेथे तिन पत्त्यांचा तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. पंचनामा करण्यात येउन २६ हजार ९९० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पो. कॉ. सत्यजित सोनाजी शिंदे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.

अळकुटी येथे रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजय बापूराव शिरोळे याच्या घरी छापा टाकण्यात येउन तेथे तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४८ हजार ६०० रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. यासंदर्भात पो. कॉ. गहीनीनाथ बबन यादव यांनी फिर्याद दाखल केली आहे. विजय बापूराव शिरोळे (वय ४१ रा. अळकुटी), छगन भिकन सैद (वय ५६ रा. पाबळ, ता. पारनेर), सतिश शिवाजी सोनवणे (वय ३८ रा. शिरापूर, ता. पारनेर), ज्ञानेश्‍वर पोपट कापसे (वय ३ रा. पाबळ, ता. पारनेर), गोरख मुरलीधर कापसे (वय ३४ रा. पाबळ, ता. पारनेर), भाउसाहेब बाळू उचाळे (वय ३८ रा. शिरापूर ता. पारनेर) यांना अटक करण्यात येउन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पारनेरमध्येही जुगार अड्डा सुरू !

पारनेर शहरातही अलिकडेच जुगाराचा अड्डा सुरू झाला असून पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी त्याच्यावर कारवाई करून जुगाऱ्यांना धडा शिकविण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बळप यांनी धडक कारवाई करून ढवळपूरी व अळकुटी येथे जुगाऱ्यांना बेडया ठोकल्याने त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

वडगांव दर्या येथे देशी दारू जप्त

तालुक्यातील वडगांव दर्या येथे देशी दारूची बेकायदेशिर विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. बाबाजी किसन परांडे (वय ३७) हा रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बसथांब्याजवळील वडापावच्या टपरीमध्ये बेकायदा देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ५७२ रूपयांच्या ११ संंत्रा देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली. बाळासाहेब बाबासाहेब भापसे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here