parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

आमदार लंके यांचे काम राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत

Parner Update Media by Parner Update Media
May 28, 2021
in राज्य, सामाजिक
0
आमदार लंके यांचे काम राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गौरवोदगार
आमदार लंके यांना १०५ वर्षांचे दिर्घायुष्य लाभावे; हजारे यांच्या शुभेच्छा
पारनेर : पारनेर अपडेट मिडीया
        मानवसेवा हीच माधवसेवा आहे या भावनेतून कोरोना संकटकाळात आमदार नीलेश लंके करीत असलेले काम केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचे गौरवोदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.तळागाळातील दिनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आमदार लंके यांना १०५ वर्षे दिर्घायुष्य लाभावे अश्या भावनीक शुभेच्छा हजारे यांनी दिल्या.
     ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी राळेगण सिद्धी येथून भ्रमणध्वनीद्वारे भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. हजारे म्हणाले की,देशात अनेक आमदार आहेत मात्र आमदार लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी २४ तास वाहून घेणारा लोकप्रतिधी विरळाच.कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आमदार लंके यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे.या कामाची माहिती, आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपचार केंद्रात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे अनुभव, त्यांच्या भावना विविध समाजमाध्यमातून, वृत्तपत्रातून ऐकायला, वाचायला मिळतात. भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झालेला रुग्ण तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव घेतल्यावर आपण आजारी आहोत,आपणास कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे विसरून जातो.
         
     संपूर्ण जगात करोना संसर्गाची दहशत असताना कोरोना उपचार केंद्रातील आनंदी वातावरणामुळे रुग्ण बरा होण्यास मोठा हातभार लागतो किंबहुना तेथील वातावरणामुळे रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी वेळेत बरा होतो.सध्याच्या वातावरणात आमदार लंके यांचे रुग्णसेवेचे काम मोठे असल्याचे हजारे म्हणाले.
     आमदार लंके ज्यावेळी आमदार नव्हते त्यावेळीही जनसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत असत हे आपण अनुभवले आहे.आमदार लंकेे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता करीत असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये असलेला आदर दिवसेंदिवस द्विगुणीत होत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक हजारे म्हणाले.
शरीर हे जनसेवेचे साधन,शरीराची काळजी घ्या
            आमदार नीलेश लंके यांनी अहोरात्र जनसेवेसाठी वाहून घेतले आहे.आणि शरीर हेच जनसेवेचे साधन आहे.त्यामुळे आमदार लंके यांनी जपल पाहिजे.काळजी घ्यायला हवी असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार लंकेे यांना दिला.त्याचबरोबर उत्तम दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

निघोजच्या कोव्हिड सेंटरमध्ये संदीप पाटलांच्या सेवाभावाची जपवणूक

Next Post

आ. लंकेच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करतात करोनावर मात !

Next Post
आ. लंकेच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करतात करोनावर मात !

आ. लंकेच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करतात करोनावर मात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘हे’ अपक्ष नगरसेवकही राष्ट्रवादीसोबत !

‘हे’ अपक्ष नगरसेवकही राष्ट्रवादीसोबत !

January 22, 2022
मुलींनो, पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्व संरक्षणाचे धडेही घ्या : राजेश्वरी कोठावळे

मुलींनो, पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्व संरक्षणाचे धडेही घ्या : राजेश्वरी कोठावळे

January 21, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर ‘यांची’ वर्णी

January 21, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

राष्ट्रवादीच्या गळाला आणखी एक नगरसेवक ! बहुमत गाठले !

January 20, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

या नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश !

January 20, 2022
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल

January 19, 2022
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali