पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायत त्रिशंकु झाल्यानन्तर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरसेविका सुरेखा भालेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पारनेर शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी गुरुवारी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायत मध्ये आठ सदस्य झाले आहेत.
भालेकर यांच्या प्रवेश प्रसंगी चंद्रकांत चेडे, एडवोकेट राहुल झावरे बाळासाहेब मते, संजय वाघमारे, डॉक्टर सादिक राजे,बाळासाहेब नगरे,अँड. गणेश कावरे,बबन चौरे,सचिन नगरे,रायभान औटी,पोटघन मेजर,विजय औटी,सचिन औटी,नितीन अडसूळ,उमेदवार उपस्थित होते.