पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पाडवा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणतात. परंतू हिंदू संस्कृतीमधील विविध सण काळाच्या पडड्याआड जाऊ लागले असताना निघोज येथील एस एम डी झुंबा फिटनेस अॅण्ड जिमच्या संस्थापिका सुचिता मंगेश ढवळे यांनी महिलांच्या पारंपारीक लेझिम तसेच झिम्मा व फुगडयांचे अयोजन करीत पाडव्याचे अर्थात नववर्षाचे मोठया जल्लोषात स्वागत केले.
गेल्या पाच वर्षांपासून महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘एस एम डी’च्या संस्थापिका सुचिता ढवळे या मराठी संस्कृती जपण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. निरोगी, सुदृढ तसेच वैभवशाली आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प यावेळी सुचिता ढवळे यांच्यासह उपस्थित महिलांनी केला.
बनकाळाच्या पडद्याआड गेलेला पारंपारीक लेझीम प्रकार पुन्हा प्रकाशझोतात आणताना सुचिता यांनी महिलांना लेझिमचे धडे देत त्यांना झुम्माच्या माध्यमातून मनसोक्त नाचविले ! त्याबरोबरच झिम्मा तसेच फुगडया खेळत महिलांनी हिंदू नववर्षाचे मोठया उत्साहात स्वागत केले. आपल्याच जुन्या परंपरांना यावेळी महिलांनी उजाळाही दिला.
सुचिता ढवळे या पारनेर शहरातही झुंबा बॉलीवूड, योगा, जिमचे प्रशिक्षण देत आहेत. महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्या विविध उपक्रमांचेही आयोजन करतात. वजन वाढविणे किंवा कमी करणे किंवा चुकीच्या गोष्टींचे सेवन न करता व्यायाम तसेच घरगुती आहार घेऊन आपले शरीर कसे निरोगी राहिल याचे सुचिता या मार्गदर्शन करतात. घराबाहेर पडून वेगवेगळया उपक्रमात सहभागी झाले पाहिजे अशी आग्रही मागणी करतानाच आपल्या पुढच्या पिढीसाठी संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे असे त्या म्हणाल्या. पुढच्या पिढीला मराठी संस्कृती, इतिहास समजला पाहिजे, महिला सक्षमीकरणाला हातभार लागला पहिजे अशी अपेक्षाही ढवळे यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. झावरे, शितल कर्डीले, जास्मीन शेख, डॉ. कोल्हे,स्वाती लाळगे, मोहिनी लोळगे, सोनाली लामखडे, जयश्री घोगरे, अस्मीता मोरे, आकांक्षा वराळ, संगिता कवाद, वैशाली कवाद, शुभांगी लामखडे, कांता लंके उपस्थित होत्या.