पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
त्रिशंकू अवस्थेतील पारनेर नगरपंचायतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून प्रभाग क्र. ३ मधील अपक्ष उमेदवार योगेश अशोक मते यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूकीनंतर आमदार नीलेश लंके तसेच योगश मते यांच्यात चर्चा होऊन विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्णय मते यांनी घेतला. सुरूवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विचारांचे असलेले मते यांनी प्रभाग क्र. ३ मधून अपक्ष उमेदवारी केली होती. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने निवडणूक यंत्रणा राबवित मते यांनी या निवडणूकीत सहज विजय संपादन केला. यापूर्वी मते यांच्या पत्नी पारनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या.
उच्चशिक्षित असलेले योगेश मते हे राजकारणात शांत व संयमी नेतृत्व म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना ते सुजित झावरे यांचे नेतृत्व मान्य करीत होते. झावरे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर मते यांनी कोणतीही भुमिका जाहिर केलेली नव्हती. या निवडणूकीच्या निमित्ताने त्यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न करता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक जिंकल्यानंतर समर्थक कार्यकर्ते तसेच मतदारांशी सल्लामसलत करून मते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेश करतानाच मते यांनी प्रभागातील कामांना सुरूवात करून घेत आपले वेगळेपण सिध्द केले. महाजन मळयास जोडणारा ६०० मिटरचा रस्ता तसेच लोणी रस्ता ते ठोंबरे वस्ती हा सव्वा किलोमिटरचा रस्ता मते यांनी आ. नीलेश लंके यांच्याकडून मंजुर करून घेतला.
शनिवारी दोन्ही रस्त्यांचे आ. लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात येऊन मते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऍड. राहुल झावरे, चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, नितीन अडसूळ, सत्यम निमसे, वैजयंता मते, रामदास मते,सुभाष मते,तात्याभाऊ गायकवाड,अरुण चोॆधरी,संदीप मते,अमोल चोॆधरी,अशोक मते,निवृत्ती मते,शिवाजी मते,दादाभाऊ गायकवाड,बाळासाहेब मते,दगडू शेरकर,बाळासाहेब नगरे,दिपक नाईक,दत्तात्रय अंबुले,संजय मते,नितीन मते,किरण ओॆटी,रवींद्र मते,मच्छिंद्र ठोंबरे,महादू दिघे,बबन व्यवहारे,बाळासाहेब जाधव,जालिंदर कासार,सोपान ठोंबरे,पंढा दिघे,सुनिल ओॆटी,सोपान मते,सुदाम मते,भाऊसाहेब येणारे,महेंद्र मगर,राजकुमार मते,मनोज ठोंबरे,हरिभाऊ मते,बाळूचे दिघे,अरूण ठोंबरे,दादा शेटे,सुहास मते,नामदेव शेटे,किरण मते,सोॆरभ मते,सागर मते आदी यावेळी उपस्थित होते.