पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जात असताना प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर वेळ दिला तर अशक्य असे काहीच नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जवळ असणाऱ्या सुप्त गुणांना वाव दिला पाहीजे असे प्रतिपादन पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नियमीत उपक्रमाअंतर्गत कोरोना नंतर चे शिक्षण व भविष्यातील संधी या विषयावर व्याख्यान आयोजीत केले त्या प्रसंगी पारनेर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर यांनी आपले मत मांडले.
तसेच या प्रसंगी महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ दिलीप ठुबे राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉ .अशोक घोरपडे , डॉ सोनट्टके डॉ एच वाय गायकवाड डॉ संजय गायकवाड डॉ सुधिर वाघ डॉ युवराज वाघेरे, डॉ हरेश शेळके , डॉ राऊत, डॉ रघुनाथ नजन , प्रा . प्रतिक्षा तनपुरे तसेच महाविदयालयातील सर्व शाखांमधील प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थितीत होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय आहेर यांनी तर आभार डॉ दत्तात्रय घुंगार्डे यांनी मानले.
डॉ. आहेर म्हणाले, मेहनत केली तरच खऱ्या अर्थाने आपल्या भविष्याची घडी बसू शकते . कोणत्याही क्षेत्राला कमी न लेखता आपले कष्ट प्रमाणिकपणे करणे हेच खरे यशाचे गमक असते. साध्याच्या काळात जग ग्लोबल होत चालले आहे. अनेक क्षेत्रात बदल होत चालले आहेत. अशा परिस्थितीमध्ये चिंता न करता स्वतः मध्ये बदल केला पाहीजे.
शिक्षणाबरोबर अनेक क्षेत्रात असणाऱ्या संधी शोधल्या पाहीजेत आपले अस्तित्त्व प्रस्तापित केले पाहीजे. आपणामधील ‘मी’ पण बाजुला केला पाहिजे व सर्व समावेशक राहीले पाहीजे, तरच आपणाला एक वेगळी उंची प्राप्त होऊ शकते. म्हणुन २१ व्या शतकामध्ये सर्वच क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरूण आपल्या क्षेत्रात संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहीजे. भिती न बाळगता वाटचाल केली पाहीजे. म्हणून मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी शोधत राहीले पाहीजे. तरच आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा स्वतः साठी होऊ शकतो, आपली वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.