मुंंबई : पारनेर अपडेट मिडिया
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा छोटा विस्तार घाटत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेे नगर जिल्हयाला संधी देण्याच्या हालचाली सध्या मुंबईत सुरू असल्याची माहीती सुत्रांकडून समजली. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक चेहरा म्हणून पुढे आलेले आमदार नीलेश लंके तसेच शरद पवारांचे नातू रोेहित पवार या दोघा आमदारांची नावे चर्चेत आहेत.
राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होत असून त्यासाठी ग्रामिण भागाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या तरूण चेेहऱ्याला या निवडणूकांच्या माध्यमातून प्रोजेक्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या विचारमंथन सुरू आहे. नगर जिल्हयातील नीलेश लंके तसेच रोहित पवार यांची राज्यातील तरूणाईमध्ये क्रेझ असून तीच क्रेझ कॅश करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगर जिल्हयातील दोघा बलाढय उमेदवारांचा पराभव करून आ. लंके व आ. पवार हे सन २०१९ च्या निवडणूकीत जायंट किलर ठरले होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर करोना महामारीने जगभरात थैमान घातले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आ. लंके यांनी लाखो नागरीकांना मदतीचा हात दिला. पहिल्या लाटेतही शरद पवारांच्या नावाने कोव्हिड सेंटर सुरू करून करोना रूग्णांना मोफत उपचार देण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना आ. लंके खंबिरपणे उभे राहिले. एक हजार शंभर बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करून तेथे राज्यभरातील सुमारे तिस हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले. आ.लंके यांच्या या समाजिक भानाचे देशातच नव्हे तर जगातही कौतुक झाले. जगभरातून या कोव्हिड सेंटरला मदत मिळाली.
आ.लंके यांच्या करोना काळातील कामाची विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यपातळीवरील विविध नेत्यांनी कौतुक केले. आ. लंके हे पारनेर नगर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग आहे. ते जेथे जातात तेथे तरूणाईच्या उत्साहास उधान आल्याचे चित्र पहावयास मिळते. आ. लंके यांच्या याच करिष्म्याचा ग्रामिण भागातील जि. प., पं. स. निवडणूकीत वापर करून घेण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपाचे वजनदार मंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव करून विजयी झालेले शरद पवारांचे नातू राहित पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षात मतदारसंघात राबविलेली कामे, पवारांच्या घरातील सदस्य म्हणून त्यांच्याविषयी असलेली जनतेमधील आपुलकी याचा विचार करून रोहित यांनाही मंत्रीपदाची संधी मिळू शकते असेही सांगितले जात आहे.