वकील अजित औटी यांनी केला युक्तीवाद
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर तालुक्यात तालुक्यातील जवळा येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रामेश्वर भगवान खरड (रा. देवटाकली ता. शेवगाव) या आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपी रामेश्वर याच्यावतीने वकील अजित औटी यांनी काम पाहिले.
पारनेर तालुक्यातील जवळे येथील इंडीया वन कंपनीचे एटीएम दि. १५ डिसेंबर (बुधवारी) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटात चोरून नेले होते.
यासंदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहीतीनुसार पहाटे पावणेएक वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे बोलेरो गाडीतून जवळे येथे पोहचले. एटीएमची रेकी करण्यात येऊन एकाने सीसीटीव्ही कॅॅमेरा बंद केला. पहाटे १२ वाजून ५१ मिनिटांनी चोरट्यांनी एटीएमच्या दिशेने बोलेरा लावून एकाने टॉमीने एटीएम फोडले. एटीएमला साखळी जोडून गाडीच्या मदतीने एटीएम ओढण्यात आले. अवघ्या चार मिनिटात एटीएम घेऊन चोरटे पसार झाले होते.
पहाटे काही लोक भजनावरून परतताना एटीएमजवळ वाहन उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, परंतू काहीतरी काम सुरू असेल असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चौकात गर्दी झाल्यानंतर एटीएमच्या खोलीत एटीएम दिसत नसल्याने नागरीकांनी जवळ जाउन पाहिले असता एटीएमचे दार तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. निघोज दुरक्षेत्राच्या पोलिसांना त्याबाबत माहीती देण्यात आल्यानंतर तात्काळ पोलिस तेथे हजर झाले. पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.
गेल्या तिन ते चार महिन्यांपूर्वी जवळे येथे इंडीया वन या कंपनीचे एटीएम बसविण्यात आले होते. आतापर्यंत या कंपनीच्या तिन एटीएमची अशाच पध्दतीने चोरी झाली आहे. दरम्यान, नगर पुणे जिल्हयाच्या सिमांवर पतसंस्था, बँका तसेच एटीएम लुटण्याच्या घटना घडत असून पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने ती चिंतेची बाब आहे.
या प्रकरणी पारनेर पोलिसांनी या प्रकरणात
1. उमेश हरिभाऊ सातपुते
2. हृतिक शिवाजी बेंद्रे
3.तुषार रखमाजी पवार.
4.दिनेश हरिभाऊ सातपुते
5.आकाश उर्फ बुंग्या सुभाष पाचुंदकर
6. सूर्यकांत उर्फ काळ्या शंकर धुमाळ
7. रामेश्वर भगवान खरड देवटाकळी तालुका शेवगाव यांना अटक करण्यात आली होती.
रामेश्वर भगवान खरड याच्या वतीने वकील अजित औटी यांनी बाजू मांडली. रामेश्वर याच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत, मुख्य आरोपी याने नाव घेतले म्हणून रामेश्वर यास अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद वकील औटी यांनी केला.