बेदम मारहाण करून वृद्धाला लुटले

0
1909

सिद्धेश्‍वरवाडी रस्त्यावरील घटना : तिघे आरोपी पसार

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

पारनेरवरून सिद्धेश्‍वरवाडीकडे अ‍ॅक्टिवा मोपेडवर निघालेल्या बाबासाहेब गबाजी नरोडे (वय ६५) यांना मोटारसायलवर आलेल्या तिघा भामटयांनी आडवून बेदम मारहाण केली. नरोडे यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम तसेच अ‍ॅक्टीवा घेउन ते पसार झाले. जखमी नरोडे यांच्यावर पारनेरमधील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुुमारास ही घटना घडली.

.यासंदर्भात पारनेर पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, बाबासाहेब नरोडे हे सिद्धेश्‍वाडी येथून पारनेर येथे वैयक्तीक कामासाठी आले होते. काम उरकून ते पानोली रस्त्याने सिद्धेश्‍वरवाडीकडे रात्री परतत असताना चाटे किडस् स्कुल परिसरात त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलवर तिघे भामटे आले. नरोडे यांच्या अ‍ॅक्टीवाला दुचाकी आडवी मारून नरोडे यांना थांबण्यास त्यांनी भाग पाडले. नरोडे यांची अ‍ॅक्टीवा थांबताच तिघांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तिन व्यक्ती असल्याने वयोवृद्ध नरोडे हे त्यांना प्रतिकार करू शकले नाहीत.

बेदम मारहाणीमुळे नरोडे हे अत्यावस्थ झाल्यानंतर भामटयांनी त्यांच्याजवळील रोख रक्कम, त्यांचा मोबाईल तसेच त्यांच्याजवळील अ‍ॅक्टीवा ताब्यात घेऊन ते पसार झाले. मारहाणीमुळे घाबरलेल्या नरोडे यांनी स्वतःला सावरत ते सिद्धेश्‍वरवाडी येथे जखमी अवस्थेत पायी गेले. तेथे घरातील सदस्यांना घडलेली माहीती सांगितल्यानंतर नरोडे यांना घेऊन इतर सदस्य पारनेर पोलिस ठाण्यात पोहचले. तेथे फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर नरोडे यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here