म्युकर मायकोसिस पिडीत सुप्यातील त्या रूग्णाचे निधन

0
3298
Mucar

सुपे : पारनेर अपडेट मिडिया

म्युकर मायकोसिसचा आजार झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सुपे येथील ३९ वर्षीय तरूणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हॉटेल व्यवसायीक असलेल्या या तरूणास कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ म्युकर मायकोसिस झाल्याने त्यास दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी हालविण्यात आले होते. आठ दिवस सुपे येथील खासगी रूग्णालयात आठ दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या गुरूवारी सायंकाळी रूग्णास म्युकर माकोसिसची बाधा झाल्याचे निदान झाले. सबंधित डॉक्टरांनी प्रशासनास त्याबाबत माहीती दिल्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी रूग्णालयात जाउन माहीती घेतली. त्यानंतर शुुक्रवारी रूग्णास पुण्यातील ससून रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

ससून रूग्णालयात रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतू त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने साखरेची पातळी कमी करण्याचे डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र साखरेचे प्रमाण कमी न झाल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रीया होऊ शकली नव्हती. त्यातच रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

म्युकर मायकोसिस आजारामुळे मृत्यू पावलेला ३९ वर्षीय तरूण सुपे येथे नगर पुणे महामार्गावर हॉटेल व्यवसाय करीत होता. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यातच कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोवर मात केल्यानंतर त्यांना पोस्ट कोव्हिड अर्थात म्युकर मायकोसिसची बाधा झाली. उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आल्यानंतर तेथे त्यांचा मृत्यू झाला. म्युकर मायकोसिसने मृत पावलेल्या हॉटेल व्यवसायिक तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सुप्यातील दुसरा बळी !

रविवारी पुण्यात मृत्यूमूखी पडलेल्या तरूणाच्या घराजवळ राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा यापूर्वी म्युकर मायकोसिस आजारामुळे मृत्यू झाल्याचीही माहीती पुढे आली आहे. या रूग्णालाही कोरोनाची बाधा झाली होती. नगर येथे उपचार सुरू असताना म्युकर मायकोसिसची बाधा होत त्याचा त्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here