राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकील !

0
4038

वडझिऱ्याच्या आदीवासी सरपंचाला शिविगाळ, दमदाटी

लसीकरणाचा वाद : दत्तात्रेय बोरकर विरोधात गुन्हा दाखल

वडझिरे : पारनेर अपडेट मिडिया

वडझिरे गावामध्ये शुक्रवारी करण्यात आलेल्या लसीकरणावरून गावातील दतात्रेय भाऊ बोरकर याने आदीवासी समाजाचे सरपंच नीलेश राधू केदारी तसेच माजी सरपंच पोपट शेटे यांना फोन करून दमदाटी करीत शिविगाळ केली. शुक्रवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. नीलेश केदारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रेय बोरकर याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की, शुक्रवारी वडझिरे येथे कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती. लसीकरणापूर्वी रॅपीड टेस्ट करण्यात येत असल्याने काही नागरीक लसीकरणासाठी आले नाहीत. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. फ्रंटलाईन वर्कर म्हणून काही ग्रामपंचायत सदस्यांनाही लसीकरण करण्यात आले. त्यातून निर्माण झालेल्या वादातून आरोपी बोरकर याने शिविगाळ केल्याची माहीती पुढे आली आहे.

सरपंच नीलेश केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे की, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रेय बोरकर याने त्याचा मोबाईल क्रमांक ९३०९७१२१३० वरून सरपंच केदारी यांचा मोबाईल क्रमांक ९८५०६२१४८० वर फोन करून ‘तुम्ही गावात जे लसीकरण केले ते चुकीचे केले आहे. तु राजिनामा दे. लसीकरणाची मला माहीती दे. मी जर गावात आलो तर एक एकाला संपवून टाकील’ अशी धमकी दिली.

सरपंच केदारी यांच्यापाठोपाठ आरोपी बोरकर याने माजी सरपंच पोपट शेटे यांना त्यांचा मोबाईल क्र. ७९७२४६३९६१ यांनाही फोन करून लसीकरणाच्याच कारणावरून शिविगाळ करीत दमदाटी केली.

सरपंच नीलेश केदारी तसेच माजी सरपंच पोपट शेटे यांनी शनिवारी पारनेर पोलिस ठाण्यात येउन आरोपी दत्तात्रेय भाऊ बोरकर याच्याविरोधात फिर्याद दिल्यानंतर त्याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here