निघोज ग्रा.पं. सदस्यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा जामीन फेटाळला

0
1226

निघोज : पारनेर अपडेट मिडिया

निघोज ता पारनेर येथील सरपंच पदाच्या निवडी अगोदर दोघा नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांच्या अपहरण प्रकरणीतील सचिन वराळ व मंगेश वराळ वगळता इतर पाच आरोपींचा अटकपुर्व जामीन खेड न्यायालयाने फेटाळला आहे. यापुर्वी या आरोपींना तात्पुरता जामीन देण्यात आलेला होता. सचिन व मंगेश वराळ यांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे.

पारनेर तालूक्यातील सर्वात मोठी व बहूचर्चित  निघोज ग्रामपंचायतची दि. ०९/०२/२१ रोजी सरपंच पदाची निवडणूक असताना दोन ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद यांना मतदानाच्या दोन दिवसआधी साधारण २० ते २५ जनांच्या टोळक्याने दोघांचे खेड परीसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. याबाबत खेड पोलिसांनी विठ्ठल कवाद यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता. यातील अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी सुटकेनंतर खेड पोलीसांना त्यांचेसोबत झालेल्या गैरकृत्याचे सत्य कथन करून जबाब दिला होता. आरोपींनी केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. व गुह्याच्या पुढील तपासा साठी आरोपींच्या पोलिस कोठडीडीची गरज असल्याने, आरोपींचा जामीन नामंजूर आला. विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये आरोपी सुनिल वराळ,निलेश घोडे, अजय वराळ,धोंडीबा जाधव,राहूल वराळ व इतर १५ आरोपी आहेत. आरोपींच्या बाजूने हजर झालेले अँड ठाणगे यांनी या प्रकरणात आरोपींना खोट्या पद्धतीने राजकीय द्वेशातुन गुंतवल्याचा युक्तीवाद करण्यात आला. यातील सर्व आरोपींना तपासासाठी पोलीसांनी ताब्यात घेवून गुन्हा करतेवेळी वापरलेली वाहने, हत्यारे व ईतर मुद्देमाल ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सचिन व मंगेश वराळ यांना उच्च न्यायालयाकडून जमीन

या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ व मंगेश वराळ यांना मुंबई उच न्यायालयाने या पूर्वींच जमीन मंजूर केला आहे. सदस्यांचे अपहरण झाले त्या वेळी सचिन व मंगेश हे दोघे निघोज येथेच होते. तसे पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जमीन यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here