आ. लंकेंवरील विश्‍वास हीच भाळवणीच्या कोव्हिड सेंटरची ‘सक्सेस स्टोरी’ !

0
1940

भाजपाच्या आमदार श्‍वेता महाले यांनाही आ. लंके यांच्या कामाची भुरळ !

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया 

आ. नीलेश लंके यांच्यावरील रूग्णांचा व त्यांच्या नातलगांचा असलेला विश्‍वास हीच भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराची ‘सक्सेस स्टोरी’ असल्याचे गौरवोद्गार बुलढाणा जिल्हयातील चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्‍वेता महाले यांनी काढले.

                                                        पहा व्हिडिओ

 

महाले यांनी गुरूवारी आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करीत आ. लंके यांचे कौतुक केले. यावेळी आ. लंके यांच्यासह अ‍ॅड. राहुल झावरे, जितेश सरडे, संदीप चौधरी, अभयसिंह नांगरे, बाळासाहेब खिलारी, शरद झावरे, बाळासाहेब लंके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महाले म्हणाल्या, फेसबुक, व्टिटर, व्हॉटस् अ‍ॅप किंवा इन्स्टाग्राम काहीही उघडा, तुम्हाला एकच नाव दिसेल ते म्हणजे आमदार नीलेश लंके ! कोरोना महामारीच्या काळात आ. लंके देत असलेली सेवा अतिशय कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. आम्हाला अभिमान आहे, आमचा विधानसभेतील सहकारी जो डॉक्टर नाहीये, जो वैद्यकिय क्षेत्रातील जाणकारही नाहीये. असे असतानाही त्यांनी सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये मतदारसंघच काय मतदारसंघाबाहेरील रूग्णही मोठया आशेने येथे दाखल होत आहेत. त्यांचा लंके यांच्यावर हा विश्‍वास आहे की येथे आल्यावर कोरोनावर आपण हमखास मात करणार आहोत. आ. लंके यांच्यावरील नागरीकांचा असलेला विश्‍वास हीच या कोव्हिड सेंटरची ‘सक्सेस स्टोरी’ असल्याचे गौरवोदगार आ. महाले यांनी काढले.

आ. महाले पुढे म्हणाल्या, अलिकडेच माझ्या सासऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आपण कोरोना रूग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापासून कोरोना रूग्णांना मदत करण्याचे काम सुरूच होते. रूग्णांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी दोन ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. त्यापूर्वी आ. लंके यांचा व्हिडीओ पाहण्यात आला होता. त्यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. त्यांनी ‘ताई तुम्ही सेंटर सुरू करा काहीही अडचण येणार नाही. काही अडचण आलीच तर मी तुमच्या पाठीशी उभा असेल’ अशी ग्वाही दिली होती. त्याच विश्‍वासाच्या जोरावर मी दोन कोव्हिड सेंटर सुरू केल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोना रूग्णाचे मानसिक संतुलन ढळू न देणं, त्याला आधार देणं, त्याची आपुलकीने चौकशी करणं या गोष्टी केल्या तर त्या रूग्णाचा स्कोअर २० असो किंवा २५ तो कोरोनावर निश्‍चित मात करू शकतो असे निरीक्षण आपण आ. लंके यांच्या कोव्हिड सेंटरला भेट दिल्यानंतर नोंदविल्याचेही आ. महाले यांनी स्पष्ट केले. भाळवणीचे आरोग्य मंदीर हे आ. लंके यांचे कुटूंब आहे, हे त्यांचं घर आहे. कोणत्याही जाती धर्माचा, विचारांचा रूग्ण असू द्या. सर्वांवर योग्य पद्धतीने उपचार करण्यात येउन त्यांना आजारातून बरे केले जाते. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे कोव्हिड सेंटर उभी राहिली पाहिजेत अशी अपेक्षाही आ. महाले यांनी व्यक्त केली.

Safalta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here