सोशल मिडियावर आ. लंके यांची धुम ! कोण आहे पडद्यामागचा कलाकार ?

0
12709

आदीवासी भागातील तरूणाचे अविरत परीश्रम ! कोटयावधी लाईक्स अन् व्हयुअर्स !

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

मनोज शिंदे

गेल्या काही वर्षांपासून राजकारण अथवा समाजकारणाचा सोशल मिडिया हा अविभाज्य घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकवर्गणी करून तब्बल साठ हजार मतांच्या फरकाने विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची चर्चा सातासमुद्रापार सुरू आहे. मात्र ज्या सोशल मिडियाच्या माध्यमातून आ. लंके हे देशविदेशात पोहचले त्या सोशल मिडियाचे काम पाहणारा कलाकार मात्र अद्यापही पडद्याआड होता. पळसपूर या आदीवासी भागात राहणारा मनोज शिंदे हा गुणी कलाकार आ. लंके यांच्या सोशल मिडियाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे !

 

शिवसेनेचे आमदार असलेल्या विजय औटी यांच्यासोबत बिनसल्यानंतर आ. लंके यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. गावोगावी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखा सुरू झाल्या. शाखांना मोठा प्रतिसाद मिळत असताना मनोज शिंदे याने ‘नीलेश लंके कोहिनूर हिरा’ हे गाणे तयार करून ते नामवंत गायकाकडून गाऊन घेतले. आ. लंके यांच्या निवडणूक तयारीच्या काळात हे गाणे भललेच गाजले. आजही आ लंके यांच्या कोणत्याही कार्यक्रमात हे गाणे एकदातरी वाजतेच !

 

आ. लंके यांनी विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय संपादन केला. त्यानंतरच्या काळातही मनोज शिंदे हा घरी बसून विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करून आ. लंके यांच्या सोशल मिडियाची जबाबदारी चोखपणे बाजावत होता. परंतू आदीवासी भागातील नेटवर्कच्या अडचणी, आ. लंके यांच्या कार्यालयात दररोज घडणाऱ्या घडामोडी या पार्श्‍वभुमिवर आ. लंके यांचे समर्थक अ‍ॅड. राहुल झावरे यांनी मनोज शिंदे याच्यावर कार्यालयात बसून सोशल मिडियाचे काम करण्याची जबाबदारी सोपविली. तेंव्हापासून आ. लंके यांच्या विविध कामांची माहीती विविध गाणी तसेच बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम मनोज करीत आहे. सध्या कोव्हीड सेंटरमधील आ. लंके यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचे, तेथे देणगी देणाऱ्या दानशुरांचे, विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे व्हिडीओ तसेच इतर माहीती सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचविण्यामध्ये मनोज दररोज व्यस्त आहे.

 

यासंदर्भात मनोजशी संवाद साधला असता त्याच्या गावात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी नीलेश लंके हे आले होते. त्यांनी गळयात हात घातला. मीत्राला फोटा करण्यास सांगितला. तेंव्हापासून मी त्यांच्या प्रेमात पडलो असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतरच आपण ‘नीलेश लंके कोहिनूर हिरा’ हे गाणे तयार केले. त्यानंतर ‘नीलेश लंकेंचे वाघाचं काळीज’, ‘नीलेश दादा ही आमची शान’, ‘आमचं भाग्य आम्हाला मिळाले नीलेश लंके साहेब आमदार’, ‘दैवत आमचे नीलेश दादा’ ‘लोकनेता मिळायचा नाय’ आदी गाण्यांची निर्मीती केल्याचे मनोजने सांगितले.

 

कोरोना काळात आ. लंके यांनी लाखो लोकांना मदत केली. अनेकांकडून आम्ही देव पाहिला अशा प्रतिक्रीया दिल्या होत्या. त्या प्रतिक्रीयांच्या अधारे नीलेश लंके साहेबांमध्ये देव पाहिला हे गाणे तयार केल्याचेही मनोजने सांगितले.

राज्यभरातील चाहत्यांकडून व्हिडीओंची निर्मिती !

विविध देश व राज्य पातळीवरील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच मनोज शिंदे याच्या माध्यमातून देश विदेशांत पोहचलेल्या आ. नीलेश लंके यांच्या कामावर खुश झालेल्या विशेषतः तरूणांनी आ. लंके यांचे शेकडो व्हिडीओ तयार केले आहेत. अनेकांनी त्यांना देवाची उपमा दिली आहे तर अनेकांनी त्यांचे इतर लोकप्रतिनिधींनी अनुकरण करण्याचा सल्ला त्या माध्यमातून दिला आहे !

कोटयावधी व्हयुअर्स आणि लाईक्स !
     आ. लंके यांच्यावर तयार करण्यात आलेली गाणी तसेच प्रासंगीक व्हिडीओंना कोटयावधी व्हुयअर्स मिळाले असून तेवढयाचा लाईक्सही आहेत. मनोज शिंदे यांच्यासोबतच आ. लंके यांच्या विविध कार्यक्रमांचेही लंके यांचे खंदे समर्थक श्रीकांत उर्फ भाऊ चौरे थेट प्रक्षेपण करतात. त्यालाही प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोरोना रूग्णांसाठी आ. लंके यांनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरच्या बातम्या तसेच व्हिडीओंच्या बाबतीत सब  कुछ आ.लंकेच असल्याचे पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here