आ. लंकेंच्या कार्यामुळे राष्ट्रवादीची जनमानसातील प्रतिमा उजळ !

0
2465

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. लंके यांच्यावर कौतुकाची थाप : प्रदेशाध्यक्षांनी केला गौरव !

मुंबई : पारनेर अपडेट मिडिया

कोरोनाच्या वैश्‍विक संकटात आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करून देश विदेशात वाहवा मिळविलेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आ. लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकीत त्यांचा गौरव केला आहे.

बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई आ. नीलेश लंके यांच्याकडून शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटर विषयी सखोल माहीती घेतली. लंके यांनी रूग्णांशी संवाद साधताना स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही पाटील यांनी आ. लंके यांना पुन्हा दिला.

पाटील यांच्या सहीने आ. लंके यांना त्यांच्या अभिनंदनाचे पत्र देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण करीत असलेल्या कार्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपले राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा प्रकारचे कार्य चालते. त्याचाच परिपाक आपण करीत असलेल्या कार्यातून दिसून येत आहे.आपल्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेशी जोडला जात आहे. तसेच आपल्या कार्यामुळे जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उजळ होत आहे. याची पक्षाच्या वाढीस व पुढील वाटचालीस मदतच होणार आहे. याचा मला आनंद होत आहे.

सध्या बऱ्याच ठिकाणी लोकांना औषधोपचारासाठी रूग्णालयात बेड मिळत नाहीत. अशा रूग्णांसाठी आपण जे कोव्हिड सेंटर तयार केले आहे. ते सर्वसामान्यांसाठी दिलासादायक व अशादायक आहे. या संकटातून निश्‍चितच पुढील काही काळात आपण बाहेर पडू असा मला विश्‍वास आहे.

गोरगरीब, हातावर पोट असलेली मंडळी, परप्रांतीय मजूर अथवा एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेला कोणीही. या सर्वांसाठी आपण व आपले सहकारी जे कार्य करत आहातत ते कौतुकास्पद आहे. त्यांचेही मनःपूर्वक अभनंदन. आपल्या भावी सामाजिक उपक्रमास माझ्या शुभेच्छा असल्याचे नमुद करून या पत्राचा समारोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here