सुजित पाटलांच्या वासुंद्यानेही दिले आ. लंके यांना १ लाख ११ हजार !

0
4139

भाळवणी : पारनेर अपडेट मिडिया

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी १ हजार १०० बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू करणाऱ्या आ. नीलेश लंके यांच्यावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील यांच्या गावातील नागरीक बेहद्द खूष आहेत. विधानसभा निवडणुकीत आ. लंके यांना ऐतिहासिक आघाडी देणाऱ्या वासुंदकरांनी कोव्हिड सेंटरला मदत म्हणून तब्बल १ लाख ११ हजार रुपयांची मदत देत त्यांच्या कामाला सलामी दिली आहे !

खा. शरद पवार यांच्यासोबत आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेल्या माजी आ. वसंतरावदादा झावरे यांच्या गावातून खा. पवार यांच्या नावाने सुरु असलेल्या कोव्हिड सेंटरला ही मदत देताना आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

वासुंदेकर ग्रामस्थांनी मतदाना बरोबर आर्थिक मदतीबरोबर इतर‌ मदत सुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांची मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी वासुंदेकरांना दिली. वासुंदे गावातील ग्रामस्थांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस आधार चारीटेबल ट्रस्ट समता मित्र मंडळ व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला १ लाख ११हजार १११ रूपयांची मदत आमदार निलेश लंके व प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,पं.स.माजी सदस्य राजेंद्र चौधरी,उद्योजक सुरेशशेठ धुरपते भागुजी झावरे,पो.द.साळुंके, बबनराव गांगड,अमोल उगले,जालिंदर वाबळे,शरद झावरे,दादा भालेकर,संजय साळुंके,सुनिल टोपले,डाँ.उदय बर्वे,डाँ.बाबासाहेब गांगड,दत्ता साळुंके,रवि गांगड,अक्षय दाते,राहुल गायखे,दादा भालके यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके म्हणाले की गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटरमध्ये जवळपास चार ते पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले‌. त्यासाठी वासुंदेकर ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा होता. वासुंदे ग्रामस्थांचे व माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून त्यांना मी कधीही विसरणार नाही असा शब्दही आ.लंके यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी भोसले म्हणाले, भाळवणी येथील आ. लंके यांच्या कोव्हिड सेंटर मध्ये आजपर्यंत २ हजार २०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या कोव्हिड सेंटरमध्ये मिळणाऱ्या आरोग्याच्या सोयी, सुविधा असो किंवा अन्नदान हे आदर्श आहे. आ. लंके यांचा आदर्श राज्यातील इतर लोकप्रतिनिधी घ्यावा असे आवाहन भोसले यांनी केले. माझ्या कार्यकाळात असा लोकप्रतिनिधी मी जनसेवा करताना कधी पाहिला नाही, असे ते म्हणाले.

आ. लंके यांच्या संकल्पनेतील  सेंटरला ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार १११ रूपयांची मदत सुपूर्त करताना आ. लंके यांच्यासह प्रांताधिकारी सुधाकर भोसले, भागुजी झावरे, पो.द.साळुंके, बबनराव गांगड, अमोल उगले, जालिंदर वाबळे, शरद झावरे, दादा भालेकर, संजय साळुंके, सुनिल टोपले, डाँ.उदय बर्वे, डाँ.बाबासाहेब गांगड, दत्ता साळुंके, रवि गांगड, अक्षय दाते, राहुल गायखे, दादा भालके यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here