लसीकरण होईपर्यंत प्राथमिक शिक्षकांना कोव्हिडची कामे नको

0
400

शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांची मागणी

  पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

राज्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने झालेले आहे. अहमदनगर शेजारील पुणे, बीड, औरगाबाद, नाशिक या जिल्ह्यामध्ये सध्या दुसरा ढोस शिक्षकांना दिला जात आहे.बमात्र सातत्याने मागणी करून देखील आमच्या जि.परिषदोच्या शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केला आहे. लसीकरण होईपर्यंत शिक्षकांना कोव्हिडची कामे देऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या जे आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारी कोविड संदर्भात कामकाज करत आहेत. त्या सर्वाचे लसीकरण पहिल्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून करण्यात आले.

याबाबत मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कोणतीही संवेदनशीलता न दाखवल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आज अखेर लसीकरणापासून वंचीत आहेत. गेल्या मार्च एप्रिल करोना लाटेच्यावेळी जिल्ह्यातील ९० % शिक्षकांनी कोविड संदर्भातील वेगवेगळी कर्तव्य शासन आदेशानुसार बजावली मात्र शिक्षण विभागाकडून या सर्व शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी न झालेमुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक वंचीत आहेत. आता नव्याने पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर प्राथमिक शिक्षकांना वेगवेळी कामे दिली जात आहेत. राष्ट्रीय कार्य म्हणून प्राथमिक शिक्षक हे कार्य प्रामाणिकपणे नेहमीच पार पाडतात. परंतु आता मात्र कोविड लसीकरण न करता प्राथमिक शिक्षकांना सदर कामावर नियुक्त करणे म्हणजे त्यांच्या जिविताशी खेळणे आहे. म्हणून कोव्हिड लसीकरण झालेशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाला कोरोणा संदर्भातील कामे देऊ नयेत. अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केलेली आहे. अशी माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली आहे.

विमा संरक्षण व लसीकरण करा

प्राथमिक शिक्षकांना ५० लाखांचे विमासरंक्षण व प्राधान्याने लसिकरण करण्याबाबत शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करत असून मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाची दखल घेऊन लसिकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा सूचना दिलेल्या आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जग्गनाथ भोर व जिपचे आरोग्याधिकारी डॉ संदिप सांगळे यांनी देखील सकारात्मकता दाखवली असून लवकरच सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल अशी अपेक्षा सरचिटणीस दत्तात्रय गमे व कार्याध्यक्ष राम निकम यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here