पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी व नगर येथील पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार शैलेश अरूण रोहोकले यांनी मास्टर गेम आयोजित राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले.
शैलेश रोहकले यांना राष्ट्रीय पातळीवर व राज्य पातळीवर विविध स्पर्धेसह कुस्ती स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकांना गवसणी घातलेली असून पोलीस दलाच्या क्रिडा स्पर्धेमध्येही नैपुण्य मिळविले आहे.
दि. २५ नोव्हेंबर २०२१ ते २७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान इंदापूर येथे पार पडलेल्या मास्टर गेम आयोजित राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेत ४० वर्षे वरील वयोगटात १०० मीटर (अडथळा शर्यत) व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाळवणीचे राष्ट्रीय खेळाडू पोलीस हवालदार शैलेश अरूण रोहोकले यांना सिल्व्हर (रौप्य)पदक पटकावले. त्यांची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना सम्राट आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलचे आंतरराष्ट्रीय पंच व कोच डॉ संतोष भुजबळ यांच्या मागदर्शनाखाली राष्ट्रीय खेळाडू मनोज शिंदे व राष्ट्रीय महिला कुस्तीगिर प्रीतम दाभाडे यांचे व मित्र परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोहोकले यांना आमदार नीलेश लंके तसेच पारनेर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.