पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तशी विविध राजकिय पक्षांनी निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. एकेकाळी देशाचे राजकारण करणारा काँग्रेस पक्ष या निवडणूकीत उतरणार की नाही याची चर्चा सुरू झालेली असताना अखेर पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले यांनी रविवारी पत्रक प्रसिध्दीस देत बुधवार दि. १ डिसेेबर रोजी पारनेर येथे आ. डॉ. सुधिर तांबे, आ. लहू कानडे, पक्षाचे निरीक्षक नरेंद्र व्यवहारे तसेच लोणावळा नगपरीषदेचे नगरसेवक निखिल मोरेश्वर यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
या मेळाव्यास काँग्रेस कमीटी, महिला काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेस, एन एस यु आय तसेच इतर सेलच्या पदाधिकारी तसेच पारनेर शहरातील सर्व फ्रंटलाईनच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या बैठकीत नगरपंचायत निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करून एका जागेसाठी एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करण्यात येणार आहे. आजपर्यंत शांत असलेला पारनेर तालुक्यातील काँग्रेस पक्ष ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भुकिमेत होता. तो पारनेर शहरात किती व कसा मोठा आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही चमत्कार घडवू शकतो याची पुरेपुर खात्री असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.
सन्मानाने वागणूक दिल्यास आघाडी करण्यास काँग्रेस पक्ष तयार आहे. तसे न झाल्यास सर्व जागांवर उमेदवार देऊन किंग होता आले नाही तर किंग मेकर नक्की होऊ याची खात्री असल्याचेही रोहकले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
दि. २७ नोहेेंबर रोजी नगर येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पारनेर नगरपंचायत निवडणूकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती निवडणूक लढविण्याचे आदेश मंत्री थोरात यांनी दिले आहेत. सर्व उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची ग्वाही थोरात यांनी दिल्याचे रोहकले यांनी म्हटले आहे.