पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विघ्नहर्ता हॉस्पिटल, पारनेर गिरिराज हॉस्पिटल व बारामती एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी हडपसर, पुणे
यांच्या सहकार्याने वासुंदे येथे रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मोफत हृदयरोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मोफत डोळे तपासणी व मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वासुंदे ग्रामस्थांनी या शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात १३७ रुग्णांनी सहभाग घेतला होता.
लंके प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी वासुंदे गावचे माजी उपसरपंच महादू भालेकर, ग्रामपंचायत सदस्य सुदाम शिर्के, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र झावरे, सोन्याबापु बर्वे, माजी चेअरमन भागुजी झावरे, बबन गांगड सर, भास्करराव शिर्के, रामदास दाते, सुनील दाते, पोपट झावरे, प्रवीण गांगड, कोंडीभाऊ झावरे, भास्कर दाते भास्कर शिंदे, दत्तात्रय साळुंके अमोल उगले, किसन जगदाळे, डॉ. उदय बर्वे डॉ. बाबासाहेब गांगड, जयेश झावरे, राहुल गायके, बाळासाहेब साळुंखे, अक्षय दाते, सुरज झोंबाडे, किरण झोंबाडे, निलेश भालके, शुभम गायखे, संजय दाते, कचरू दाते, बाळासाहेब दाते, गीताराम जगदाळे सर, ऋषिकेश दाते, ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब, पत्रकार शरद झावरे, आदी मान्यवर व आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान वासुंदे येथील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब खिलारी म्हणाले, आमदार लंके यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा घेऊन आमदार आपल्या दारी हा विशेष उपक्रम आम्ही सध्या राबवत असून आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे म्हणाले, आमदार लंके संपूर्ण तालुक्यात आरोग्यसेवेचे उत्तम कार्य करत मोफत नेत्र तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे वासुंदे या ठिकाणी आज आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.