पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतच्या निवडणूकीसाठी विविध राजकिय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अॅक्टीव्ह मोडमध्ये आली आहे. मनसे नेेते बाळा नांदगांवकर यांनी शहर अध्यक्ष वसीम राजे यांना निवडणूकीसंदर्भातील चर्चेसाठी मुंबईत बोलविले आहे. मुंबईस रवाना होण्यापूर्वी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडून सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पारनेर नगरपंचायतसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून सद्य राजकिय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व विरोधक एकवटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमिवर काय भुमिका घ्यायची याबाबत पारनेर येथील बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा सुर निघाला.
मनसे शहराध्यक्ष वसीम राजे हे सोमवारी सकाळी नेते बाळा नांदगांवकर यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होणार असून नांदगावकर यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर निवडणूकीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची चिन्हे आहेत. निवडणूकीच्या रणनितीसंदर्भात नांदगांवकर मार्गदर्शन करणार आहेत. स्वतः लढावे की आघाडीत सहभागी व्हावे याबाबतही बैठकीत निर्णय होईल असे वसिम राजे यांनी सांगितले.