फिरत्या एटीएम व्हॅनचे उदघाटन संपन्न
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर बाजार समिती कांदा व इतर शेतीमालाची खरेदी विक्री करणारी राज्यात आणि परराज्यात नावाजलेली बाजार समिती आहे.या समितीत व्यवहार करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा सहकारी बँकेने फिरत्या एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले.
फिरती एटीएम व्हॅनची सुविधा व बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या शुद्ध पाणी प्रकल्पाचे उदघाटन शेळके यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, उपसभापती विलास झावरे,संचालक अण्णासाहेब बढे ,महानगर बँकेचे संचालक कोठावळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मारुती रेपाळे, संजय बरडे,तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, प्रभाकर लाळगे,बबन शेलार,संजय दरंदले, भगवान शिंदे,अमोल रेपाळे, सचिव संघटनेचे अध्यक्ष दत्ता पतके उपस्थित होते.
समितीतील पारदर्शी कारभारामुळे पारनेर सह नगर,श्रीगोंदा,शिरुर,जुन्नर तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात.शेतीमालाच्या विक्रीची रक्कम आडत व्यापारी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करतात.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी फिरती एटीएम व्हॅन बाजारांच्या दिवशी समितीमध्ये उपलब्ध असणार असल्याचे शेळके म्हणाले.शेतकरी,व्यापारी तसेच इतर घटकांनी फिरते एटीएम व शुध्द पाणी प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती विलास झावरे व संचालक मंडळाने केले आहे.
भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या
गेल्या पाच वर्षांत बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.समितीच्या आवारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.