पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील पारनेर पब्लिक स्कुलच्या तिन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेच्या दोन स्टेज पार करून राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्तीसाठी ते पात्र ठरले आहेत.
विदयालयाचे प्राचार्य गिताराम म्हस्के यांनी यासंदर्भात माहीती दिली. एटीएसई अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून पारनेर पब्लिक स्कुलची दिव्या दादाभाऊ ठुबे, ओम सचिन शेटे, सिद्धेश नंदकुमार मापारी या तिन विदयार्थ्यांनी स्टेज दोन पात्र करून राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त केली. परिक्षेच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाची भयानक स्थिती व ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसतानाही सर्व यशस्वी विदयार्थ्यांना शंभूनाथ भालेकर, दादा पाचारणे, सविता कानवडे, आदीनाथ नांगरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विदयार्थ्यांचे पद्मभूषण अण्णा हजारेे, इंद्रभान डांगे, संस्थेच्या अध्यक्षा सविता म्हस्के, संस्थापक गिताराम म्हस्के, दत्तात्रय काकडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
पारनेर पब्लिक स्कुलच्या विदयार्थ्यांनी आजवर विविध स्पर्धा परिक्षा तसेच शालेय स्पर्धांमध्ये नेत्रदिपक यश संपादन करून जिल्हयात आपले वेगळेपण जपले आहे. या विद्यालयाचे अनेक विदयार्थी चांगल्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.