चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांची माहीती
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेरचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांच्या किसान बहुउद्देशिय संस्थेच्या किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राज्यच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली असून या शैक्षणिक वर्षांपासून तिनही विभागांचे वर्ग सुरू होणार असल्याची माहीती चेडे व भालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी चेडे व भालेकर यांनी सहा वर्षांपूर्वी किसान बहुउद्देशिय संस्थेची स्थापना करून इंग्रजी माध्यामाचे विद्यालय सुरू केले. तेथे उच्चशिक्षीत शिक्षकांची नियुक्ती करण्यात येउन प्रत्येक विद्यार्थी अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही पारंगत होईल याची काळजी घेण्यात आली. केंद्रीय पातळीवरील सी बी एस सी अभ्यासक्रम सुरू करून भविष्यातील स्पर्धा परिक्षांचा पाय भक्कम करण्याची दुरदृष्टीही चेडे व भालेकर यांनी दाखविली. त्यामुळेच विविध वैद्यकिय अभ्याक्रमांसाठी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली
बारावीपर्यंत सी बी एस सी अभ्यासक्रमामधून अनेक विद्यार्थी घडत असताना तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार महाविदयालयीन शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारकडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाविद्यालयासाठी आवष्यक पायाभुत सुविधाही आगोदरच उपलब्ध करून ठेवण्यात आल्या होत्या. शासनाच्या पथकाने या सुविधांची पाहणी करीत अलिकडेच राज्यातील इतर महाविद्यालयांबरोबरच ‘किसान’च्या महाविद्यालयासही परवाणगी देण्यात आली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या महाविदयालायत प्रवेश देण्यात येणार असून तेथे दर्जेदार शिक्षण देण्यात येऊन ‘किसान’चे वेगळेपण जपण्यात येणार आहे. पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘किसान’च्या महाविद्यालयात घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे आवाहन चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर यांनी केले आहे.
अल्प फिमध्ये दर्जेदार शिक्षण
तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने हे महाविद्यालय सुरू करण्यात आले असून कमीत कमी फी आकारूनविद्यार्थ्यांना तेथे प्रवेश देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.