पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रशासनावरील पकड, कोणताही प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची हातोटी तसेच विकासकामांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रशांत गायकवाड, अण्णा बढे, राजेंद्र चौधरी, ठकाराम लंके, बापु शिर्के, पोटघन मेजर, बाळासाहेब लंके, संजय मते, भाऊ चौरे, अनिल गंधाक्ते, राहुल झावरे, आप्पा शिंदे, तात्या देशमुख, विनायक शेळके, फिरोज हवालदार, दिपक येणारे, प्रकाश गुंड, विजू औटी, नामदेव घुले, किशोर ठुबे, सचिन ठुबे, चंदु ठुबे, बाळासाहेब खोसे, सुरज भुजबळ, संभाजी नरसाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, संभाजी वाळुंज, प्रकाश गाजरे, संदिप ठाणगे, विश्वास शेटे, माऊली वरखडे, मंगेश लंके, सचिन काळे, भाऊसाहेब भोगाडे सर, महेश ठुबे, वसंत ढवण, सत्यम निमसे, संतोष ढवळे, अभिजीत शिंदे, शाहीर रामदास गुंड, महेंद्र गायकवाड, मुरलीधर सुपेकर, बोधाराम चौरे गुरूजी, शिवाजी कवडे, शिवाजी ठाणगे, शांताराम किनकर, दिपाली गायकवाड, बाजीराव कारखिले, पुनमताई मुंगसे, दिपाली औटी, कविता औटी, पाकिजा शेख, पारनेर-नगर मतदार संघातील ५१ भेदीक टीमचे प्रमुख इ. उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार लंके पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहेत. दुष्काळी पारनेर तालुक्याच्या शेतीच्या सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी अजितदादा आग्रही आहेत. गेल्या दोन अर्थसंकल्पात त्यांनी पारनेर तालुक्यासाठी विशेष निधीची तरतूद करून तालुकावासीयांना न्याय दिला आहे.
भविष्यातही अनेक योजना राबविण्याचे अजितदादांचे धोरण आहे. पारनेर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडे आपला पाठपुरावा सुरू असून हे काम लवकरच मार्गी लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लंके यांच्या वतीने यांच्या वतीने गोरगरीब, निराधार व भेदीक शाहीर मंडळ यांना पुढील प्रमाणे ५ लाख ४ हजार रुपये किमतीचे साहित्य वितरण तसेच ५ दिव्यांग व्यक्तींना औषधोपचारासाठी प्रत्येकी २० हजार आर्थिक मदत अशी एकूण ६ लाख ४ हजार रुपयांची गरजूंना मदत करण्यात आली. ५ कडबा कुट्टी १ लाख ५ हजार, २ पाणबुडी मोटर २ लाख ४२ हजार, ३ पिठाच्या गिरण्या २ लाख २६ हजार, १५ सायकल ६७ हजार ५००, १५ शिलाई मशीन ९० हजार, १ झेरॉक्स मशीन ६० हजार, ५१ शाहीर डफ २५ हजार ५००, ७ कृषी कडबा कुट्टी, २ मिरची कंडप मशीन २५ हजार.
कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या ३५ नागरिकांच्या वारसांना शासनाच्या संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून अनुदान सुरू करण्यात आले.