parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

चेअरमन शिवाजी व्यवहारे यांची पत्रकार परिषद

Parner Update Media by Parner Update Media
July 21, 2021
in सामाजिक
0
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

सैनिक बँकेचे विरूध्द तक्रार करणारे तक्रारदार हेच गुन्हेगारी व खंडणीखोर प्रवृत्तीचे असल्याचा आरोप बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे यांनी केला. बँकेची निवडणूक जवळ आल्याने हेतुपुरस्सर हे आरोप करण्यात येत आहेत.

व्यवहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बँकेवर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले असून त्यात नमूद करण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

१. अरूण रोडे यांचा व सैनिक सहकारी बँकेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून ते बँकेचे खातेदार,
ठेवीदार, सभासद, कर्जदार किंवा कोणत्याही कर्जदार जामीणदार सुध्दा नाहीत. तसेच ते स्वतः कोणत्याही
प्रकारचा उदयोगधंदा करत नसून कायम कोणत्या ना कोणत्या संस्थेविरूध्द तसेच शासकीय कर्मचारी
अधिकारी यांचे विरूणध्द तक्रारी करणे व त्यांना ब्लॅक मिल करूण त्यांचे कडून खंडणीची मागणी करणे हे
नुकतेच समोर आले असून तालुक्यातील अनेक संस्था व शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांविरूध्द अनेक
ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. नुकतेच पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने तहसिल
कार्यालय,पारनेरचे मा. तहसिलदार यांचे कडून श्री अरूण रोडे यांना खंडणी घेताना रंगेहात पकडले होते व
त्यानुसार श्री रोडे यांचे विरूध्द खंडणी मागणी व खंडणी घेण्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला असून त्यांनी आता पर्यंत सैनिक बँकेचे विरूध्द तब्बल ३९ तक्रार अर्ज तेचतेच मुददे परत परत अर्जामध्ये नमुद करूण सहकार खात्याकडे व शासकीय कार्याल्याकडे तक्रार अर्ज केलेले आहेत. विशेष म्हणजे अरूण रोडे संकल्पीत केलेली अण्याय निवारण निर्मुलण सेवा संस्था ही कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत संस्था नसून ही संस्था पूर्ण पणे बोगस असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सैनिक बँकेने या संस्थेचे नोंदणीकृत
कागदपत्राची गेली ६ महीने माहीतीचे अधिकार या कायदयाअन्वये वारंवार मागणी करूणही श्री रोडे किंवा
त्यांचे संस्थेचे पदाधिकारी श्री राजाभाउशेठ यांनी अदयाप पर्यंत दिलेली नाही व कागदपत्रांची मागणी केलेले पूरावे सुध्दा सैनिक बँकेकडे आहेत.

२. विनायक गोस्वामी :- हे बँकेचे स्थापने वेळी म्हणजेच सन १९९५ साली क्लार्क म्हणून सेवेत होते व
त्यावेळी त्यांचे कडे कॅशीअरचा चार्ज असताना त्यांनी नोटांचे बंडल मध्ये अपहार केलेला होता तेंवहा पासून
ते बँकेमध्ये आले नाहीत व त्यामुळे श्री गोस्वामी यांना बँकेचे सेवेतून काढून टाकण्यात आलेले होते. बँकेचे
सन २०१६-२०२१ चे संचालक मंडळ निवडणूकीचे प्रक्रीयेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारी केली होती परंतू
सन २०१६ चे बँकेचे पंचवार्षीक निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराचे तुलनेमध्ये फार मोठया मताधिक्याने
पराभूत झााल्याचे नाराजीतून व बँकेची सन २०२१ ची निवडणूक जवळ आल्यामुळे बँकेचे संचालक मंडळ,
कर्मचारी व बँकेस बदनाम करण्याचे दुष्ट हेतूने ते वारंवार तक्रारी करत आहेत.

३. बाळासाहेब नरसाळे :- हे बँकेचे सभासद असून सन २०१६ चे बँकेचे संचालक मंडळ निवडणूकीचे
प्रक्रीयेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारी केली होती व पॅनल तयार करण्याचा प्रयत्न केला होता परंतू त्यांना
साधा उमेदवारांचा पॅनल सुध्दा पूर्ण करता आला नव्हता त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीली
होती या निवडणूकीमध्ये त्यांचा विजयी उमेदवाराचे तुलनेमध्ये फार मोठया मताधिक्याने पराभव झाला होता व याच नाराजीतून व बँकेची सन २०२१ ची निवडणूक जवळ आल्यामुळे तसेच श्री नरसाळे यांनी दोन
कर्जदार यांना कर्ज देण्यासाठी शिफारस केली होती व त्यांचे शिफारसी नसुर त्या कर्जदारांना कर्जसुध्दा
दिलेले होते.परंतू सदरील कर्ज खाते थकीत व एनपीए झाल्याने बँकेने कर्जवसुलीसाठी त्यांचे विरूध्द
कायदेशीर कारवाई केली आहे त्यातील एक कर्जदार यांनी जप्त केलेली मालमत्ता विकली आहे परंतू बँकेचे
विशेष वसुली अधिकारी यांनी सदरचे खरेदीखताचे नोंदीस स्थगीती आदेश दिलेला आहे त्यामुळे श्री नरसाळे हे बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी व बँकेस बदनाम करण्याचे दुष्ट हेतूने तेसुध्दा वारंवार तक्रारी करत आहेत.

४. वैभव पाचारणे अण्याय निवारण समीतीचे सचीव म्हणून मिरवणारे श्री वैभव पाचारणे हेच स्वतः
पारनेर तालुक्यातील फार मोठे वाळू तस्कर असून त्यांनी सुध्दा पारनेर येथील नायब तहसिलदार यांना
नुकतीचे धक्का बुक्की करून वाळू टिपर पळवून नेला होता व तसा धक्का बुक्की केले बाबतचा गुन्हा पारनेर
येथील नायब तहसिलदार यांनी पारनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता.

५.चंद्रकांत पाचारणे हे बँकेचे सन २००४ ते सन २०११ चे थकीत कर्जदार श्री देवराम गावडे यांचे कर्जखात्यास
जामीनदार होते व सदरील कर्जाची थकबाकी व कर्ज बाकी वसुली साठी बँकेने कर्जदार देवराम गावडे व
त्यांचे जामीणदार बंधू श्री संजय गावडे यांचे स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव अनुक्रमे ६ वेळा लावलेला
होता परंतू सदरचे लिलावामध्ये भाग घेण्यासाठी कोणीही उपस्थीत न राहील्यामुळे पर्यायाने कायदयातील तरतुदीप्रमाणे त्यांचे दुसरे जामीणदार या नात्याने चंद्रकांत पाचारणे यांचे नावावरील मौजे पळवे खु. येथील जमीनीचा लिलाव केलेला होता व त्यामुळे वैभव पाचारणे हे बँकेस व बँकेचे कर्मचारी यांना त्रास देण्याच्या हेतूने बँकेविरूध्द खोटया स्वरूपाच्या तक्रारी करत आहेत.

५.भरत हटावकर :- कोळगाव ता. श्रीगोंदा येथील रहीवासी असलेले हटावकर यांनी स्वतःच त्यांचे
कर्जाची परत फेड डिसेंबर २००७ मध्ये केलेली होती व या नंतरफेब्रुवारी २००८ मध्ये हटावकर यांनी त्यांचे
नावावरील जमीन त्यांचे चुलत बंधू यांना स्वतः विक्री करून खरेदीखत करून दिलेली आहे तरी सुध्दा बँकेचे
विरूध्द जाणीवपूर्वक खोटे तक्रार अर्ज करत आहेत.

६. पुरूषोत्तम शहाणे शहाणे कुटुंबाचा व बँकेचा संबंध सन १९९६ मध्ये सोने तारण कर्जासाठी सोने
परीक्षणाचे व सदरील सोन्याचांदीचे दागीण्याचे बाजारमुल्य (व्हॅल्युएशन) काढण्याचे कामामुळे आलेला होता. सन १९९६ साला पासून ते सन २००२ या दरम्यान शहाणे कुटुंबाचे प्रमुख सदस्य नारायण शहाणे व राजेंद्र शहाणे हे बॅकेचे गोल्ड व्हॅल्यूअर होते व या दरम्यान सोने तपासणी मध्ये शहाणे यांनी अफरातफर करूण बँकेची मोठया प्रमाणावर फसवणूक केली होती परंतू ही बाब बँकेचे अधिकारी वर्गाचे वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता त्यावेळी शहाणे या अफरातफरीची रक्कम शहाणे यांचे कडून भरूण घेण्यासाठी त्यांचे नारायण शहाणे यांचे नावावरील मौजे सुपा ता. पारनेर येथील जमीन गट नं. ६२ मधील क्षेत्राचे
तारणावर त्यांना कर्ज घेतले होते व सदरचे कर्जातून सोने तारणमधील अफरातफरीची रक्कम भरूण घेण्यात आली होती बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांचेमध्ये गैरसमज तयार होवू नये तसेच शहाणे हे सुपा येथील
बाजारपेठेतील व्यापारी असल्यामुळे आब्रू जावू नये म्हणून त्यावेळी त्यांचे वर बँकेचे तत्कालीन संचालक
मंडळाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नव्हती किंवा त्यांचे वर गुन्हा दाखल केला नव्हता. पुढे
शहाणे यांचे कर्जाचे खाते थकीत झााल्यानंतर बँकेने वसुलीची कायदेशीर कारवाई चालू केल्या नंतर शहाणे
कुटुंबाने नावाप्रमाणेच शहाणपणाचा कळस करून कर्जाचा भरणा केल्याच्या बनावट व खोटया पावत्या तयार करूण सहकार न्यायालय, अहमदनगर येथे दाखल केल्या होत्या व या बनावट व खोटया पावत्या बँकेने पाहीले नंतर त्वरीत शहाणे कुटुंबीया विरूध्द पारनेर येथील मा. न्यायालयामध्ये फौजदाररी गुन्हा दाखल केला होता. सदरील दावा चालू असताना बँकेने शहाणे यांचे संपूर्ण कर्ज वसुली साठी कायदेशीर रित्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव सन २०११ मध्ये ठेवलेला होता परंतू शहाणे कुटुंबाचे मुखत्यार यांचे विनंती वरूण फक्त गट नं. ६२ या क्षेत्रा लिलाव करूण बँकेची काही रक्कम वसूल करण्यात आली व नंतर शहाणे यांचे मुखत्यार श्री राजेंद्र शहाणे यांनी एकरकमी कर्ज परत फेड योजने अंतर्गत अर्ज देवून त्यांचे सर्व कर्ज खाते सन २०१४ मध्ये बंद केले आहेत या नंतर शहाणे कुटुंबातील सर्व कर्जदारांनी त्यांची शेअर्सची रक्कम परत घेतलेली
आहे. व कर्ज खाते बंद झााल्यानंतर तब्बल ७ वर्षानंतर शहाणे यांनी परत एकदा बँकेला फसवीण्याचा
उपदव्याप चालू केलेला आहे. तक्रारदार पुरूषोत्तम शहाणे यांचे विरूध्द विविध न्यायालयामध्ये चोरीचे सोने
खरेदीचे सुध्दा गुन्हे दाखल असून तालुक्यातील अजून एका बँकेस सोने तारण कर्ज व्यवहारामध्ये फसवीले
असून त्याचा सुध्दा गुन्हा शहाणे यांचेवर पारनेर न्यायालया मध्ये दाखल आहे म्हणजेच शहाणे कुटुंब हेच
गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून साळसूद पणाचा आव आणत असून जनतेची व पर्यायाने शासनाची दिशाभूल करत
असून बँकेची बदनामी करत आहेत. संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेतील अपहार :- सदरचे योजनेतील काही
खातेदाराबाबत गैरव्यवहार करणारे बँकेतील कर्जत शाखेचे अपहार करणारे एक कर्मचारी यांचे कडून अपहार केलेली रक्कम व्याजासह वसूल करून शासनास परत केलेली असून त्यांना बँकेचे सेवेतून निलंबीत करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल सुध्दा दाखल केलेला आहे.

७. संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेतील अपहार :- सदरचे योजनेतील काही
खातेदाराबाबत गैरव्यवहार करणारे बँकेतील कर्जत शाखेचे अपहार करणारे एक कर्मचारी यांचे कडून अपहार केलेली रक्कम व्याजासह वसूल करून शासनास परत केलेली असून त्यांना बँकेचे सेवेतून निलंबीत करून
त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल सुध्दा दाखल केलेला आहे.

८. बँकेच्या मार्च २०१६ अखेरच्या ठेवी ७३ कोटी तर कर्ज वाटप ५२ कोटी होते तर मार्च २०२१ अखेर
बँकेच्या ठेवी मध्ये ६० कोटीने वाढ होवून १३३ कोटीच्या ठेवी बँकेकडे असून ९२ कोटीचे कर्ज वाटप बँकेने चालू वर्षाअखेर पर्यंत केलेले असून कोरोना सारख्या महामारी मध्ये सुध्दा बँकेची कर्ज वसुली चांगली झालेली आहे अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कोरडे यांनी दिली.

कितीही शिंतोडे उडविले तरी बँकेच्या हिताचे काम करीत राहणार !

बँकेच्या बदनामीची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी त्यांच्या एकाही आरोपात तथ्य नाही. सन २००६ मध्ये मी बँकेची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी बँकेची स्थिती अतिशय वाईट होती. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनाही ही बँक उर्जित अवस्थेत येईल की नाही याची खात्री नव्हती. मात्र आपल्यासह संचालक मंडळाने अथक परिश्रम घेऊन बँकेला संकटातून बाहेर काढले. आज बँक उत्तम स्थितीत असून सभासद, ठेवीदार यांनी अशा आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे अवाहन व्यवहारे यांनी केले आहे.

Previous Post

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

Next Post

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

Next Post
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

July 24, 2021
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

July 22, 2021
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

July 21, 2021
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

July 21, 2021
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ?वॉच?

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

July 20, 2021
पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

July 20, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali