parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक

Parner Update Media by Parner Update Media
July 24, 2021
in सामाजिक
0
मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

मुंबई : पारनेर अपडेट मिडिया

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा (Mobile / Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि शासनाच्या निदर्शनास आले आहे की, भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी / कर्मचारी।यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. त्यामुळे शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव इंद्रा मालो यांनी अधिकारी व कर्मचारी यांना मोबाइल वापराबाबत बंधने घालून दिली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने विशेष परिपत्रकाद्वारे खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.

१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील
दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा
वापर करावा.

३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या
उपस्थितीची जाणीव ठेवावी.

४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच
असंसदीय भाषेचा वापर करू नये.

५. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message)
शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद
साधावा.

६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन
कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व
भाषेचे तारतम्य बाळगावे.

८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.

९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent /
vibrate mode वर ठेवावा.

१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे,
ear piece/ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.

११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.

सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र.
२०२१०७२३१९२३३८४५०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन
काढण्यात आले आहे.

 

 

Previous Post

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

Next Post

वंचितांना भोजन, पूरग्रस्तांना मदत करीत उदय शेळके यांचा वाढदिवस !

Next Post
वंचितांना भोजन, पूरग्रस्तांना मदत करीत उदय शेळके यांचा वाढदिवस !

वंचितांना भोजन, पूरग्रस्तांना मदत करीत उदय शेळके यांचा वाढदिवस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिक स्पर्धेमध्ये पारनेर तालुका अग्रेसर

पिक स्पर्धेमध्ये पारनेर तालुका अग्रेसर

July 26, 2021
‘सीएम, बीएम गेला उडत’ मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना नारायण राणेंचा ढळला तोल !

‘सीएम, बीएम गेला उडत’ मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना नारायण राणेंचा ढळला तोल !

July 26, 2021
अखेर, कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा !

अखेर, कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा !

July 26, 2021
कृषी व अर्थशास्त्र विभागात स्वप्नील चौधरी विद्यापीठात प्रथम

कृषी व अर्थशास्त्र विभागात स्वप्नील चौधरी विद्यापीठात प्रथम

July 26, 2021
एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल !

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल !

July 26, 2021
मनसेचा तालुकाध्यक्ष बाळू माळी ‘टू प्लस’ गुन्हेगार !

मनसेचा तालुकाध्यक्ष बाळू माळी ‘टू प्लस’ गुन्हेगार !

July 25, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali