पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
समाजातील वंचित घटकांना भोजन, पूरग्रस्तांना मदत तसेच वृक्षारोपण करून जिल्हा बँके तसेच जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
युवा नेते गोपी काळभोर यांच्या पुढाकारातुन शनिवारी सकाळी पारनेर शहरातील सिद्धार्थ वसतिगृहाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी प्रभाग क्र. सात मधील वंचितांना भोजन देण्यात आले. त्यांनतर राज्यातील पूरग्रस्तांना विविध प्रकारची मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बोलताना गोपी काळभोर म्हणाले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत स्व. गुलाबराव शेळके यांनी जीवनात यश संपादन केले. महानगर बँकेसारखी देशातील आदर्श बँक उभी केली. त्यांच्या अकाली निधनानंतर उदयराव शेळके यांनी स्व. शेळके यांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मिळविलेला एकतर्फी विजय, त्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड त्यांच्या कर्तृत्ववावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.
शेळके कुटुंबाने नेहमीच समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या याच भूमिकेस साजेसे उपक्रम राबवून उदयराव शेळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे काळभोर म्हणाले.
यावेळी खादी ग्रामोद्योगचे व्हा.चेअरमन राजेंद्र कंरदीकर,योगेश बुगे, आकाश औटी, शरद नगरे, जुनेद शेख, मयूर रूईकर आदी उपस्थित होते.