पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष व पोलिस दलातील पदच्युत शिपाई बाळू माळी याचा नगर पोलिसांच्या टू प्लस आरोपींच्या यादीत समावेश झाला आहे ! माळी याच्याविरोधात गावठी कट्टयांची विक्री, खंडणी मागणे, दमदाटी करून जमीन बळकावणे, आदींसह राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत !
बाळू माळी हा राज्याच्या पोलिस दलात सेवा करीत असताना शिपाईपदाचा गैरवापर करून त्याने अनेक गैरकृत्ये केली. त्यामुळे तो सुरूवातीस निलंबित झाला. त्यानंतर आरोपी सिद्ध झाल्याने सुरुवातीस निलंबन व त्यांनतर त्याला पदच्युत करण्यात आले. शिपाई पदाच्या काळात बाळू याने अनेक नागरीकांना वेठीस धरून मोठी संपत्ती जमा केली. त्याच संपत्तीच्या जोरावर तो सध्या राजकारण करीत असून काही गुंडांच्या मदतीने सामान्य शेतकरी वार्गाच्या जमीनी हडप करण्याचे, खंडणी मागण्याचे, गावठी कट्टे विक्रीचे उदयोगही तो करीत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष म्हणून एखाद्या शासकिय कार्यालयात अर्ज दाखल करायचा, त्याचे फोटो सेशन मिडियावर व्हायरल करून विशिष्ट वर्तमानपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध करून आणायच्या व त्यानंतर सबंधितास वेठीस धरण्याचे उद्योग सध्या माळी करीत असून त्याच्या या उद्योगाचे छायाचित्रणही सबंधितांनी करून ठेवले आहे.
पोलिस दलातून पदच्चुत झाल्यानंतर बाळू माळी याने गावळी कट्टे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याप्रकरणी त्यास नगर पोलिसांनी अटकही केली होती. काही दिवस पोलिस ठाण्यात डांबण्यात आल्यानंतर बाळूचा जामीन मंजुर झाला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या बाळू यास भविष्यात झावरे यांनीही सोडून दिले. राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणूनही तो मिरवत होता. चोऱ्या माऱ्यांचे आरोप सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीने बाळूची पक्षातून हकालपट्टी केली.
नेहमीच अवैध व्यवसाय करण्यासाठी राजकीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माळी याने तालुक्यात कमकुवत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्षपद अश्चर्यकारकरित्या मिळविले. त्यानंतर त्याने पुन्हा आपले कारनामे दाखविण्यास सुरूवात केली असून पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाळू माळी आरोपींच्या रांगेत !
जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी टू प्लस गुन्हेगारांची समरी काढून त्यांना त्या त्या पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे फर्मान सोडले होते. त्यावेळी बाळू माळी गुन्हेगारांच्या रांगेत मागे उभे राहून स्वतः चे तोंड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत करीत होता.
मनसे पदाधिकाऱ्याची चुप्पी !
तालुक्यात मनसेचा किल्ला लढविणाऱ्या एका पदाधिकाऱ्यास माळी याच्या गैरकृत्याविषयी विचारले असता त्याने कानावर हात ठेवले ! तो त्यावेळेला राष्ट्रवादीत होता असे सांगून सारवासारव करण्याचा त्याने प्रयत्न केला. माळीला राष्ट्रवादीने निलंबित केल्याची आठवण करून दिल्यानंतर यापुढे असे करणार नाही असे सांगितल्याने त्यास तालुकाध्यक्षपद दिल्याचे या आक्रमक पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र मला या वादात मध्ये घेऊ नका असेही तो पदाधिकरी म्हणाला.