आमदार नीलेश लंके यांची बारामतीमध्ये बॅटींग : म्हणाले, ही तर आमची प्रतीपंढरी !
बारामती : पारनेर अपडेट मिडिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वक्तशिरपणा सर्वश्रुत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास उशिरा येउन कसे चालेल ? मी बारा तास आगोदरच बारामतीमध्ये पोहचल्याचे सांगत आमदार नीलेश लंके यांनी बारामतीमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार बॅटींग करीत उपस्थितांच्या टाळया घेतल्या.
अजितदादा पवार युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. आ. लंके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, अनिता गायकवाड, रेणू भोसले, अनिता बनकर, अमोल भोसले, विद्याधर काटे, अमोल भोसले, ज्ञानदेव गोरे, अनिल कांबळे, सोमनाथ गायकवाड, दत्ता माने, राहूल चौधरी, अॅड. राहूल झावरे, संदीप चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यभर मोठा चाहता वर्ग असल्याने कोणत्याही प्रवासादरम्यान आ. लंके यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांना ठिकठिकाणी जावे लागते. कार्यकर्त्यांचा आग्रह न मोडणाऱ्या लंके यांना त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमास पोहचताना नेहमीच विलंब होतो. बारामतीच्या कार्यक्रमासाठीही असाच उशिर होणार हे लक्षात घेऊन आ. लंके यांनी आदल्या दिवशीच बारामतीमध्ये मुुक्कामी येत अजितदादा युथ फेडरेशनच्या कार्यक्रमास वेळेवर हजेरी लावली. वेळेत पोहचल्याचे त्यांनी स्वतःच सांगत इथे उशिर करून कसे चालेल असा प्रश्न त्यांनी केला.
बारामती आमच्यासाठी प्रतीपंढरपूर आहे. या पंढरीमध्ये आमचे पावसाने स्वागत केल्यामुळे आम्ही धन्य झाल्याचे सांगून आ. लंके म्हणाले, देशाला दिशा देण्याचं, नेतृत्व देण्याचं काम बारामतीने केले. बारामतीच्या प्रत्येक युवकात आम्ही पवार साहेबांना, अजितदादांना तर प्रत्येक भगीनीमध्ये सुप्रियाताईंना पाहतो. या भुमीने अनमोल रत्न जन्माला घातले. त्यांच्या तालुक्याचे तुम्ही रहिवासी आहात तुम्ही भाग्यवान आहात. ज्या ज्या वेळी देशावर, राज्यावर संकट आले त्यावेळी पवार साहेब, अजितदादा धावून गेल्याचे आपण वेळोवेळी अनुभवले आहे. झटपट निर्णय घेणारा अजितदादांसारखा नेता माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचेही आ. लंके यांनी सांगितले.
अजितदादा युथ फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोरोना संकटातही उदघाटनापूर्वीच चारशे रक्तदात्यांनी रक्तदान करून बारामतीचे वेगळेपण तरूणांनी जपले आहे. कोरोनापूर्वी याच युवकांनी २ हजार ४०० रक्तपिशव्यांचे संकलन करून देशात विक्रम प्रस्तापित केला होता. त्याचा आदर्श इतर तरूणांनी घ्यावा. बारामतीकरांचं व आमचं जिवा भावाचं नातं आहे. गुरू शिष्याचं नातं आहे. तुम्ही दहीहंडीच्या कार्यक्रमास आमंत्रीत केलयं, दहीहंडीच काय कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आम्हाला आनंद वाटेल असेही ते म्हणाले.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, कोरोना काळातही तरूणांनी मोठया प्रमाणात रक्त संकलन करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. आज आम्ही महीला व्यासपिठावर बसलो आहोत त्यासाठी आम्ही पवार साहेबांच्या देणेकरी लागतो. महिलांना पन्नास टक्के आरक्षण देत खऱ्या अर्थाने मान, सन्मान, पद प्रतिष्ठा मिळवून दिली. माझ्यासारख्या सामान्य महिलेस राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पवार साहेबांमुळेच मिळाली. ८० वर्षांच्या या योद्धयाने समाजकारणात आशा पद्धतीन काम केले की त्यांच्या प्रत्येक विचारात महिलांचा विचार आग्रक्रमाने असतो. महिलांच्या मातृत्वाचा त्यांनी सन्मान केला. त्यामुळेच आम्हाला बारामतीने आत्मविश्वास दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले.