parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

उपसरपंच राजेश शेळकेसह कांडेकरांचा भाऊ व दोन मुले अटकेत !

Parner Update Media by Parner Update Media
June 12, 2021
in गुन्हे
0
कांडेकरांचा मारेकरी राजाराम शेळकेची हत्या !

राजाराम शेळके हत्येप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल : राहूल शेळकेची फिर्याद

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

नारायणगव्हाणचे तत्कालीन सरपंच प्रकाश कांडेकर यांची भाडोत्री शार्प शुटरकडून हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे सजा भोगत असलेला गुन्हयाचा मुख्य सुत्रधार नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम जयवंत शेळके याच्या शुक्रवारी झालेल्या शुक्रवारी हत्येप्रकरणी नारायणगव्हाणचा विदयमान उपसरपंच व प्रकाश कांडेकर यांचा भाचा राजेश भानुदास शेळके याच्यासह प्रकाश कांडेकर यांचे भाऊ सुर्यभान, मुलगा संग्राम व अनिकेत या चौघांना सुपे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या चौघांसह गणेश भानुदास शेळके, भुषण प्रकाश कांडेकर, सौरभ सुर्यभान कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर या आठ जणांविरोधात सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी त्याचा मुलगा राहूल याने सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहूल यालाही तत्कालीन सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेली असून तोही सध्या पॅरोलच्या सुटीवर आहे. राहूल याने फिर्यादीमध्ये नमुद केले आहे की, प्रकाश कांडेकर यांच्या खुनाप्रकारणी शिक्षा झाल्यानंतर सन २०१८ मध्ये पॅरोल रजेवर आलो, त्यावेळी नारायणगव्हाण येथे कुकडी कालव्याच्या बाजूने शेतीकडे जात असताना राजेश शेळके याने चारचाकी वाहनातून येत जमीनीवरील दगडे उचलून धावून आला. वाईट शिविगाळ करण्यात आल्याने आपण पुण्यास निघून गेलो असल्याचे राहूल याने फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.

त्याच दरम्यान राजाराम शेळके हा देखील संचित रजेवर आलेला होता. राजाराम तसेच राहूलचा भाऊ अतुल हे नारायणगव्हाण येथील शेतीकडे आले असता कुकडी कालव्याच्या समोरील त्यांच्या घरासमोर उभे असताना राजेश शेळके, प्रकाश कांडेकर यांची मुले संग्राम प्रकाश कांडेकर व अनिकेत प्रकाश कांडेकर, भुषण प्रकाश कांडेकर, प्रकाश यांचा भाऊ सुर्यभान भाउसाहेब कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर, सौरभ सुर्यभान कांडेकर, गणेश भानुदास शेळके यांनी हातात कोयते घेऊन कुकडी कालव्या समोरील रस्त्यावर उभे राहून राजाराम व अतुल यांना शिविगाळ केली होती. तुम्ही गावातून जिवंत कसे जाता अशी धमकी देण्यात आल्याचे त्यावेळी राजाराम व अतुल यांनी आपणास व आपल्या कुटूंबियांना सांगितले होते असेही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. राजराम व आपण संचित रजेवर आल्यामुळे आरोपींनी आम्हास जिवे मारण्याचा कट रचला होता. त्याच भितीने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे तसेच नारायणगव्हाण येथे येण्याचे टाळले होते असेही फिर्यादी राहूल याचे म्हणणे आहे.

सन २०१९ मध्ये आपण व राजाराम ज्यावेळी संचित रजेवर गावी येत असताना राजेश शेळके, संग्राम कांडेकर, अनिकेत कांडेकर, भुषण कांडेकर, सुर्यभान कांडेकर, अक्षय कांडेकर, सौरभ कांडेकर, गणेश शेळके हे नेहमी शिविगाळ, दमदाटी करीत. मे २०२० पासून कोरोना विषाणूच्या साथरोगामुळे राजाराम व राहुल यांना पॅरोल रजा मिळाल्यानंतर ते सुरेक्षेच्या कारणामुळे पुणे येथेच वास्तव्यास होते. राहूल हा सुरक्षेच्या कारणामुळे पुणे येथे नेहमीच वास्तव्यास होता तर राजाराम अधून मधून शेतीकडे येत होता असे फिर्यादीत म्हटले आहे.

मे २०२१ पासून राजाराम याने शेतीच्या सपाटीकरणाचे काम सुरू केले होते. त्यामुळे तो एकटाच नारायणगव्हाण येथील त्याच्या शेतातील घरात राहत होता. सुरक्षेच्या दृष्टीने शेतामधील घराच्या परिसरात सी सी टी व्ही बसविण्यात आले असून त्याचे लाईव्ह कव्हरेज राहूल व अतुल हे नियमित पाहत होते. राजारामचा दररोज त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क होत होता.

दि. ७ जुन रोजी राजाराम व राहूल याचा फोन झाला त्यावेळी गावामध्ये कोणी त्रास देत आहे का अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी शेतीमध्ये फेरफटका मारीत असताना राजेश शेळके, संग्राम कांडेकर यांनी त्यांच्या शेतामध्ये उभे राहून शिविगाळ दमदाटी केली होती. जिवे मारण्याची धमकी देत होते. दगड फेकून मारत होते.सुर्यभान कांडेकर व प्रकाश कांडेकर यांची मुले कालव्यााच्या कडेला असलेल्या रस्त्यावरून चकरा मारीत होते. अशी माहीती दिली होती. त्याच वेळी राहूल याने राजाराम यास पुणे येथे निघुन येण्याचा सल्ला दिला होता.

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजारामचा मुलगा अतुल यास शेतीवरील मुकादम संतोष मच्छिंद्र शेळके याने फोन करून राजाराम यास शेतामध्ये येउन कोणीतरी मारले असून त्यास शिरूर येथील रूग्णालयात उपचारासाठी घेऊन आल्याचे सांगितले. त्यानंतर राहूल व अतुल हे शिरूरला येण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान चौकशी करण्यात आली, त्यावेळी राजारामचा मृत्यू झाल्याचे संतोष शेळके याने सांगितले. त्यानंतर दोघा भावांनी शिरूर ग्रामिण रूग्णालयात जाउन पाहणी केली असता राजाराम याच्या मानेतून रक्तस्त्राव झालेला होता. वैद्यकिय अधिकाऱ्यानी राजाराम मयत झाल्याचे घोषीत केले होते असे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.

राजाराम याचा आठही आरोपी तसेच अज्ञात साथीदार यांनी पूर्व वैमनस्यातून कट करून धारदार हत्याराने राजाराम जयवंत शेळके (वय ६५) याच्यावर वार करून जिवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था सोडून गोकावे कोव्हिड सेंटरमध्ये व्यस्त !

कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असताना सुपे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे मात्र लोकवर्गणी करून कोव्हिड सेंटर चालविण्याच्या कामात सध्या व्यस्त आहेत. गेल्या आठवड्यात नारायनगव्हाण शिवाराशेजारील एका कंपनीच्या अधिकाऱ्यास टोळक्याने बेदम मारहाण केली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. कारवाई मात्र काहीच झाली नाही. पोलीस प्रशासन गुंडांना पाठीशी घालीत असल्याचा संदेश वारंवार जात असल्यानेच धाडस करून मारेकऱ्यांनी राजाराम शेळके याचा काटा काढला असावा अशी चर्चा सुरू आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीच्या पंचक्रोशीत आठवड्यात या दोन घटना घडल्या आहेत. पोलिस अधीक्षक त्याविरोधात काय भूमिका घेतात याची आता उत्सुकता आहे.

सबंधित बातमी वाचा

कांडेकरांचा मारेकरी राजाराम शेळकेची हत्या !

कांडेकरांचा मारेकरी राजाराम शेळकेची हत्या !

Previous Post

कांडेकरांचा मारेकरी राजाराम शेळकेची हत्या !

Next Post

राजेश शेळकेसह चौघांना ९ दिवसांची पोलिस कोठडी  

Next Post
राजेश शेळकेसह चौघांना ९ दिवसांची पोलिस कोठडी  

राजेश शेळकेसह चौघांना ९ दिवसांची पोलिस कोठडी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

July 22, 2021
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

July 21, 2021
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

July 21, 2021
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ?वॉच?

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

July 20, 2021
पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

July 20, 2021
आता चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरस : पहिल्या मृत्यूची नोंद

आता चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरस : पहिल्या मृत्यूची नोंद

July 20, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali