करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे
मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
करोनाने संपुर्ण जगात हाहाकार माजविला. चीन पासून करोनाची सुरवात झाली आणि तो संपुर्ण जगात पसरला, असा दोष आताही चीनला दिला जातो. आता पुन्हा एकदा चीनमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये चेपज्ञशू इ व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. चीन सीडीसी वीकलीनुसार, मार्चच्या दोन मृत माकडांचे ऑपरेशन केल्यानंतर बीजिंगमधील पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली. त्यानंतर २७ मे रोजी त्यांचे निधन झाले.
चेपज्ञशू इ व्हायरसची लागण झालेल्या ५३ वर्षीय डॉक्टरला पहिल्यांदा मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर ताप आणि न्यूरोलॉजिकल समस्या जानवल्या. ते अनेक रुग्णालयात उपचारासाठी गेले परंतु २७ मे रोजी त्यांचे निधन झाले. या डॉक्टरने दोन माकडांचे ऑपरेशन केले होते. सीडीसी साप्ताहिकानुसार, एप्रिलच्या मध्यात संशोधकांनी रुग्णाच्या काही द्रव्यांची तपासणी केली. यानंतर, निकालांमध्ये अल्फाहेरव्हायरसचा विषाणूचा संसर्ग असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर संशोधकांनी रुग्णाचे रक्त, गळ्याचील स्वॅब, नाकातील स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. यानंतर संस्थेने सँपलची तपासणी केली. ही तपासणी मंकी बी व्हायरस, जोस्टर व्हायरस, मंकीप्रॉक्स व्हायरस आणि ऑर्थोपोक्सव्हायरसाठी होती. यामध्ये केवळ मंकी बी व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.
काय आहेत लक्षणे?
करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. ज्यात ताप आणि थंडी, स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. कालांतराने, विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस जखमेत लहान लहान फोडं येऊ शकतात, तर इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा, मळमळ आणि उलट्या होणे, पोटदुखी आणि हिचकीचा समावेश आहे.
काय आहे मंकी बी व्हायरस?
- चिनी सीडीसी वीकलीनुसार, मंकी बी व्हायरस थेट संपर्काद्वारे आणि शरीराबाहेर द्रव्याव्दारे बाहेर पसरतो. हा व्हायरस १९३२ मध्ये आढळला होता. हा व्हायरस थेट संपर्क आणि शारीरिक स्रावाद्वारे पसरतो. हा व्हायरस आफ्रिकन लंगूरपासून उद्भवला आहे. आतापर्यंत ६९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यातील ७० ते ८० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जेव्हा मंकी व्हायरस मानवामध्ये पसरतो तेव्हा तो केंद्रीय मज्जासंस्थेवर प्रभावीत होतो. व्हायरची लागण झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर लक्षणे दिसतात.