पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील नारायणगव्हाचा माजी सरपंच राजाराम शेळके यांची तिक्ष्ण हत्याराने निघृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेळके त्याच्या शेतात काम करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके हा एकटाच होता अशी प्राथमिक माहिती आहे. धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्याच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यास तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
१३ नोव्हेंबर २०१० रोजी नारायणगव्हाणचे तत्कालीन सरपंच प्रकाश कांडेकर यांची डोक्यात गोळी घालून भाडोत्री शार्प शूटर कडून हत्या करण्यात आली होती. कांडेकर व माजी सरपंच राजाराम शेळके यांच्यात राजकीय वैर होते. हत्या झाल्यानंतर कांडेकर यांचे भाचे व विद्यमान उपसरपंच राजेश शेळके यांनी राजाराम शेळके यांच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तात्काळ राजाराम शेळके व त्याच्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पुढे मोबाईल सीडीआरच्या मदतीने राजाराम शेळके याने मरेकऱ्यांना सुपारी देऊन कांडेकर यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हत्येनंतर गावात तणाव असतानाच कांडेकर यांच्या डोक्यातील गोळी शवविच्छेदनादरम्यान गहाळ करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित डॉक्टरलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक रजपूत यांनी १४ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोप सिद्ध होऊन आरोपीना शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजाराम याची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. शेळके हा शेतात काम करीत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होता. त्याच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्याचा मुलगा व इतरांना या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात अली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची रजा उपभोगत असताना त्याने गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.