parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

आणखी दोन दिवस पावसाचे सावट

Parner Update Media by Parner Update Media
March 23, 2021
in राष्ट्रीय, सामाजिक
0
आणखी दोन दिवस पावसाचे सावट

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी सरींमुळे शेतमालाचे नुकसान

पुणे : पारनेर अपडेट मिडिया

हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस होत असून, ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी (22 मार्च) विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. पुणे, महाबळेश्‍वर, औरंगाबाद, अकोला आदी भागांत जोरदार सरी बरसल्या. मराठवाड्यातील ग्रामीण भागात सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले.

अरबी समुद्रातून सध्या उत्तर-पश्‍चिाम भारतात बाष्पाचा पुरवठा होत असल्याने या भागात पाऊस होतो आहे. राज्यातही हवेची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे सध्या कर्नाटकच्या किनार्‍यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याच स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दरम्यान गारपीटही झाली. कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे सावट राहणार आहे. काही भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह कोकण विभागातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल. काहीठिकाणी हवेचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी दुपारी मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह महाबळेश्‍वरमध्ये जोरदार सरी कोसळल्या. विदर्भातील अकोला, चंद्रपूर आदी जिल्ह्यात संध्याकाळी साडेपाचपर्यंत पावसाची नोंद झाली. औरंगाबादसह मराठवाड्यात सोमवारी पुन्हा पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असणार्‍या अवकाळी पावसात 184 गावातील पिके बाधित  झाल्याचे अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहेत. एकूण दोन हजार 538 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन दिवसांनंतर पुन्हा तापमानवाढ

राज्यात सध्या पावसाची स्थिती असल्याने सर्वच ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन ते सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, रात्रीचा उकाडाही कमी आहे. मात्र, दोन दिवसांनंतर राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परिणामी 25 मार्चनंतर दिवसाच्या कमाल तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

Previous Post

 करोना लसीकरणाच्या नियमात मोठे बदल

Next Post

बोठेला मदत करणारांचा पोलिसांकडून शोध

Next Post
टोलनाक्यावर वाहनचालकास लुटले : दिड तासांत पाच आरोपी जेरबंद

बोठेला मदत करणारांचा पोलिसांकडून शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

July 24, 2021
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

July 22, 2021
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

July 21, 2021
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

July 21, 2021
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ‘वॉच’

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

July 20, 2021
पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

July 20, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali