parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

कारने घेतला पेट : चालकाचा होरपळून मृत्यू

Parner Update Media by Parner Update Media
September 24, 2021
in गुन्हे
0
कारने घेतला पेट : चालकाचा होरपळून मृत्यू

बोरपाडळे  : पारनेर अपडेट मिडिया

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे (ता. पन्हाळा) घाटात कारने पेट घेतल्याने वाहनचालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय ३५, ता. आजरा) असे मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा चालकाचा प्रयत्न अयशस्वी झाला. या आगीत चारचाकीसह चालक जळून खाक झाला. ही आग स्थानिकांसह कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाने आटोक्यात आणली. रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी करून कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, सहायक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. ठाणेकर हा सध्या आसुर्ले-पोर्ले परिसरात राहण्यास होता.

डंपर-दुचाकी धडकेत मांजरेतील दोघे ठार

मलकापूर :  मोटारसायकल-डंपरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन तरुण ठार झाले. बाळासाहेब लहू भातडे (वय २०) व त्याचा मित्र सचिन बाळकृष्ण शेलार (२३, दोघेही रा. मांजरे, ता. शाहूवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करंजफेण-मांजरे मार्गावर मोसमपैकी सोष्टेवाडी येथे हा अपघात झाला. शाहूवाडी पोलिसांत याची नोंद झाली आहे. बाळासाहेब भातडे व सचिन शेलार मोटारसायकलवरून (एम. एच. ०९ जी ३६२४)  करंजफेण येथून मांजरे गावी परत येत होते. मंदिरासमोर रस्त्यावर उभ्या असणार्‍या डंपरला (एम.एच. १० सीआर ९७७२) मोटारसायकलची धडक बसली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Previous Post

महिला पोलीसांना आता १२ ऐवजी ८तास ड्युटी !

Next Post

पुढील चार दिवस पावसाचे !

Next Post
यापुढे दरवर्षी यंदाप्रमाणेच पावसाचा मुक्काम !

पुढील चार दिवस पावसाचे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘हे’ अपक्ष नगरसेवकही राष्ट्रवादीसोबत !

‘हे’ अपक्ष नगरसेवकही राष्ट्रवादीसोबत !

January 22, 2022
मुलींनो, पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्व संरक्षणाचे धडेही घ्या : राजेश्वरी कोठावळे

मुलींनो, पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्व संरक्षणाचे धडेही घ्या : राजेश्वरी कोठावळे

January 21, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर ‘यांची’ वर्णी

January 21, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

राष्ट्रवादीच्या गळाला आणखी एक नगरसेवक ! बहुमत गाठले !

January 20, 2022
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांचा शासनाला घरचा आहेर !

या नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश !

January 20, 2022
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल

January 19, 2022
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali