गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गुणवत्तेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात अव्वल असल्याचे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले.
गेल्या वर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बुगे यांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा गौरव करण्यास विलंब झाल्याचे बुगे यांनी स्पष्ट केले.
सरपंच सुरेश काळे,मुख्याध्यापक रा.या.औटी,माजी मुख्याध्यापक जी.टी.ठुबे,उपसरपंच वर्षा पानमंद,
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा थोरात, रत्नमाला नरवडे,मल्हारी रेपाळे,भास्कर औटी, सुरेश सोनवणे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका श्रीमती ठकुबाई अडसरे,राजेंद्र थोरात,रविंद्र मते,सुनील शेळके,
गणेश पुणेकर, भरत खोडदे आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी बुगे म्हणाले पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षकांमुळे शाळेचा पंचक्रोशीत नावलौकिक आहे.त्यामुळे तालुक्यातील विविध गावांतील पालकांनी आपल्या पाल्यांना येथील शाळेत प्रवेश घेतला आहे.अनेक पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी इच्छूक आहेत.ही बाब शाळे बरोबरच शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद आहे.जिल्ह्यात सर्वात जास्त संख्येने पिंपरी जलसेन शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता
यादीत आले आहेत.ही बाब शाळेची आणि शिक्षकांची गुणवत्ता अधोरेखित करणारी असल्याचे बुगे म्हणाले.
प्रास्ताविक सतीश भालेकर यांनी तर सूत्रसंचालन जयप्रकाश साठे यांनी केले.
पिंपरी जलसेन शाळा दिशादर्शक
जिल्हा परिषदेची पिंपरी जलसेन येथील मराठी माध्यमाची शाळा तालुक्यातील इतर शाळांसाठी दिशादर्शक आहे.नियमीत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम या शाळेत राबवले जातात.त्यामुळे इतर गावांमधील पालक आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात ही बाब गौरवास्पद आहे.
बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी, पारनेर