आ. नीलेश लंके यांची माहीती
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
‘क वर्ग’ तिर्थक्षेत्र विकास योजनेमधून तालुक्यातील सात गावांमधील देवस्थानांना प्रत्येकी पाच लाखांचे तिन हायमॅक्स दिवे मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली. सात गावांसाठी एकूण १ कोटी ५ लाखांचा निधी मंजुर झाला आहे.
विविध देवस्थानांना हायमॅक्स दिवे बसविण्यासंदर्भात आ. लंके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुचना देऊन सातही गावांना प्रत्येकी तिन हायमॅक्स दिवे देण्याची सुचना केली. त्यानुसार हे हायमॅक्स मंजुर करण्यात आले आहेत.
श्री देवी अंबिका ट्रस्ट देवीभोयरे १५ लक्ष, श्री. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट १५ लक्ष, श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट अपधूप १५ लक्ष, काळभैरवनाथ देवस्थान जातेगांव १५ लक्ष, गोरेश्वर देवस्थान ट्रस्ट गोरेगांव १५ लक्ष, पिर शेख बहुउददीन रहेदर्गा दरोडी १५ लक्ष, शांतानंद महाराज मंदीर रायतळे १५ लक्ष या देवस्थानांना एकूण १ कोटी ५ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
तालुक्यातील इतर देवस्थानांनाही अशाच पद्धतीने हायमॅक्स दिवे देण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मोठया गावांमध्येही हायमॅक्स दिवे बसविण्याचे नियोजन असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.