नाशिक : पारनेर अपडेट मिडिया
पावसाने राजस्थान आणि दक्षिणेतील कांद्याचे नुकसान केले असल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा सध्या भाव खातोय. अफगाणिस्तानमधून कांद्याचे २५ ट्रक भारताकडे रवाना झाले आहेत. त्यातील ६ ट्रक कांदा अमृतसरमध्ये दाखल झाला आहे. किलोला २५ ते २६ रुपये असा त्याचा भाव आहे. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचा किलोचा भाव सरासरी ३८ ते ३९ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, पुण्यात आज कांद्याचा क्विंटलचा भाव ३५ रुपये असा राहिला
पावसाने राजस्थान आणि दक्षिणेतील कांद्याचे नुकसान केले असल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा सध्या भाव खातोय. जिल्ह्यातही पावसाने रोपांसह कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अशातच, नवीन लाल कांद्याची विक्री सुरु झाली आहे. शनिवारी (ता. १६) लासलगावमध्ये लाल कांद्याचा क्विंटलचा भाव २ हजार ५६०, तर सरासरी १ हजार ९०० रुपये असा राहिला. तसेच उन्हाळ कांदा लासलगावमध्ये ३ हजार ६४० आणि सरासरी ३ हजार ३५०, तर पिंपळगाव मध्ये ४ हजार २०० व सरासरी ३ हजार ४५१ रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. येवल्यात ३ हजार ७१२ व सरासरी ३ हजार १००, कळवणमध्ये साडेचार हजार आणि सरासरी साडेतीन हजार, तर चांदवडमध्ये ३ हजार २९० व सरासरी २ हजार ८००, उमराणेमध्ये ३ हजार ५५० आणि ३ हजार रुपये सरासरी क्विंटल असा भाव निघाला होता. देशाला पुरवठा करणाऱ्या राजस्थान आणि कर्नाटकमधील कांद्याच्या नुकसानीमुळे नाशिकच्या बाजारपेठेत उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती काय राहणार? यावर देशातंर्गत पाठवला जाणार की निर्यातीचा विचार होणार याचे सूत्र ठरण्यास मदत होणार आहे.