पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
सोनेवाडी (चास) येथे सोनई कृषी विद्यापीठाअंतर्गत सन २०२० – २१ च्या कृषी कर्यानुभव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कृषी कन्या कोमल वेठेकर हिने यावेळी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कोमल हिने स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना सामाजिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी माती परीक्षण करण्यात येऊन त्यातील कमी अधिक घटकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिज प्रक्रिया, चारा प्रक्रिया तसेच शेती क्षेत्रातील अँपचा वापर, निंबोळी अर्क बनविणे, एकात्मिक तण व्यवस्थापन, रासायनिक खते, औषधांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कंपोस्ट खत बनविणे याची शेतकऱ्यांना यावेळी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हरि मोरे, श्रीमती एस एम पेरणे, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कोमल वेठेकर हिचा सत्कार केला.