parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

अखेर कोंबडं आरवलं ! ढवळपुरीच्या आश्रमशाळेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर !

Parner Update Media by Parner Update Media
June 17, 2021
in शैक्षणिक, सामाजिक
0
अखेर कोंबडं आरवलं ! ढवळपुरीच्या आश्रमशाळेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर !

पुण्याच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने धाडली कारणे दाखवा नोटीस : समाजकल्याण उपायुक्त यांच्या अहवालाने केली पोल खोल !

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

ढवळपूरी येथील धन्वंतरी मेडीकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौंडेशनच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील गैरव्यवहाराची अखेर पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने गंभीर दखल घेतली आहे. संचालनालयाचे संचालक दिलीप हाळदे यांनी समाजकल्याण विभागाच्या नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्तांनी संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करून प्रशासन नेमण्यासंदर्भात सादर केलेल्या अहवालानुसार आश्रमशाळेची मान्यता रद्द का करण्यात येउ नये यासाठी कारणे नोटीस बजावली आहे. येत्या २१ जुन रोजी दुपारी १२ वाजता पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाकडे सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश हाळदे यांनी दिले आहेत. यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात येऊनही त्या ‘मॅनेज’ केल्या जात असल्याने धन्वंतरी व अल्फा एज्युकेशनलचे गौडबंगाल उघडकीस येत नव्हते. संचालक दिलीप हाळदे यांनी खमकी भूमिका घेतल्याने अखेर कोंबडं अरवलं व कारणे दाखवा नोटीस बजावली गेली.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी यासंदर्भात मागास बहुजन कल्याण विभागाकडे लेखी तक्रार करून आश्रमशाळेची चौकशी करून प्रशासन नेमण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार नाशिक येथील समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांनी ढवळपूरी येथे येउन सखोल चौकशी केली असता त्यातअनेक गंभीर बाबी आढळून आल्या.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशााळा व वसतीगृह ज्या जागेमध्ये व इमारतीमध्ये चालविल्या जातात, ती संस्थेच्या मालकीची जागा व इमारती धन्वंतरी मेडिकल अ‍ॅण्ड एज्येकेशन फौंडेशन या संस्थने त्यांच्याच अल्फा सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौंडेशन या दुसऱ्या संस्थेस विनामोबदला बक्षिसपत्र करून देण्याबाबतचा ठराव केला. तशी पारनेर येथील दुययम निबंधकांकडे नोंद आहे. संस्थेने केलेले हे बक्षिसपत्र पुणे येथील धर्मदाय सहआयुक्तांनी २६ डिसेंबर २०२० रोजी बेकायदेशिर ठरवून रदद केले आहे.

अल्फा सोशल एज्युकेशनल फौंडेशन या दुसऱ्या संस्थेस दान देऊन त्याच जागेवर सावित्रीबाई फुले संलग्न वरिष्ठ महाविद्यालय हे विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील मुलांच्या वसतीगृहामध्ये सुरू केल्याचे पाहणी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आश्रमशाळेच्या वसतीगृहातील ३२० निवासी विदयार्थ्यांना राहण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यावरून संस्थेने एकाच जागेचा दोन संस्थांसाठी एकाच इमारतीचा दोन विभागाच्या योजनांसाठी वापर झाल्याचे स्पष्ट झाले.

याच संस्थेने आश्रमशाळा चालविल्या जात असलेल्या आवारात सन २००६ ते २०१८ या कालावधीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली असलेले हंगामी वसतीगृह चालविल्याचेही चौकशीत उघड झाले. या हंगामी वसतीगृहाची इमारत कोठही दिसून आली नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. हंगामी वसतीगृह आश्रमशाळेसाठी असलेल्या इमारतीमध्ये चालविण्यात येत होते. हंगामी वसतीगृहातील विद्यार्थी, आश्रमशाळेच्या निवासी विद्यार्थ्यांसमवेत एकत्र ठेवण्यात आले. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठीची निवास व्यवस्था, स्वयंपाकगृह, क्रीडांगण, शौचालय, स्नानगृह या सुविधांचा वापर करण्यात आला. त्यामुुळे आश्रमशाळेच्या विदयार्थ्याच्या सुविधांवर ताण आला. हंगामी वसतीगृह स्वत्रंपणे न चालविता बेकायदेशिर रित्या आश्रमशाळेच्या वसतीगृहात चालविण्याचे पाहणीत स्पष्ट झाले.

विद्यार्थीनींची मदतनीस व स्वयंपाकी म्हणून नियुक्ती !

हंगामी वसतीगृहासाठी आश्रमशाळेच्याच शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांची बेकायदेशिररित्या विनापरवाणगी मानधनावर नियुक्ती करण्यात आली. आश्रमशाळेत सन २०१६ – १७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रतिक्षा गोरक्षनाथ लांबहाते, सोनाली गिरजू बाचकर, सुनिता भारत चंद, फसाबाई सखाराम हांडे या विद्यार्थीनींची वसतीगृहासाठी मदतनीस व स्वयंपाकी म्हणून विनापरवाणगी मानधनावर नियुक्ती करण्याचा पराक्रमही पथकाच्या पाहणीत उघड झाला.

चिमुरड्यांकडून फी उकळून लाटले अनुदान !

निवासी प्राथमिक आश्रमशाळेतील दुसऱ्या इयत्तेत प्रवेशित विदयार्थी राज बाळू चव्हाण व चौथीच्या इयत्तेत प्रवेशित युवराज नाना बनगर हे दोन्ही विदयार्थी हजेरी पटावर नोंदविलेले आहेत. या दोन्ही विदयार्थ्यांकडून सेनापती बापट मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी शाखा ढवळपूरी या पतसंस्थेत व्यवस्थापक / सचिव, खाजगी वसतीगृह ढवळपूरी यांच्या नावाच्या बचत खाते नंबर ७७ मध्ये अनुक्रमे १ हजार ५०० व १ हजार रूपये वसतीगृह फी पोटी जमा झाल्याचे चलन चौकशी पथकाच्या हाती लागले असून शासनाचे अनुदान संस्थेने लाटल्याचे त्यावरून सिद्ध झाले आहे.

ताशेरे !

सांडपाण्याची व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने केलेली नाही, अभिलेख पूर्णपणे अद्यावत ठेवलेले नाहीत, सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेउन कर्मचारी निलंबन व बडतर्फी केलेली नाही, संस्थेने शासनाविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करणे, सर्वात ज्येष्ठ डी एड, बी एड धारक शिक्षकाची मुख्याध्यापकपदी नियुक्ती न करणे, संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग, अनियमितता, अवैध कामकाज, गुन्हे नोंद आदींवरही अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत.

‘तो’ शिक्षकही ‘रडारवर’

संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहणारा स्थानिक शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून गोरगरीब धनगर, वंजारी, भिल्ल, आदीवासी विद्यार्थ्याची लुट केल्याप्रकरणी ढवळपूरी परीसरात चिड व्यक्त करण्यात येत आहे. संस्थेचे हे व्यवहार पाहणाऱ्या शिक्षकानेही मोठी माया जमविली असून विविध ठिकाणी त्याने मालमत्ता खरेदी केल्याचीही वंदता आहे. शिक्षक दांम्पत्य एकाच ठिकाणी वास्तव्यास असताना दुहेरी घरभाडे भत्त्याचा लाभही या शिक्षकाकडून घेतला जात असून त्याचीही आता वसुली होणार आहे.

Previous Post

विविध कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजुर

Next Post

दादासाहेब पठारेंची मृत्यूशी झुंज अयशस्वी

Next Post

दादासाहेब पठारेंची मृत्यूशी झुंज अयशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

July 24, 2021
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

July 22, 2021
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

July 21, 2021
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

July 21, 2021
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ‘वॉच’

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

July 20, 2021
पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

July 20, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali