पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीच्या चार प्रभागांच्या निवडणूकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची माघारीची आजची (सोमवार दि. १०) अखेरची मुदत असून कोण कोण अर्ज मागे घेणार ? व कोण कोण लढणार ? याची शहरात उत्सुकता आहे.
राज्य शासनाने अध्यादेशाद्वारे ओबीसींना दिलेले आरक्षण सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने स्थगित झाल्याने पारनेर नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीतील २, ११, १३ व १४ या प्रभागांतील निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. उर्वरीत १३ प्रभागांत मतदान घेण्यात आल्यानंतर या चार प्रभागात पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येऊन सर्वसाधारण व महिलांसाठी प्रभाग आरक्षीत करण्यात आले. त्यात प्रभाग २ व प्रभाग १४ हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग ११ व १३ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले. या चार प्रभागांसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार असून दि. १९ रोजी सर्व १७ प्रभागांची मतमोजणी पारनेर येथेच होणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत पुढीलप्रमाणे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
प्रभाग ११
सुहास लहुराव रेपाळे (अपक्ष), विलास तुकाराम मते (अपक्ष), अशोक फुलाजी चेडे (अपक्ष), हसन अमीर राजे (अपक्ष), सागर अशोक चेडे (अपक्ष), उमेश माणिकराव औटी (शिवसेना), राजू बशिर शेख (अपक्ष), विजय बाबूराव डोळ (राष्ट्रवादी), अशोक फुुलाजी चेडे (भाजपा)
प्रभाग १३
विपुल संजय औटी (अपक्ष), विशाल अर्जुनराव शिंदे (शहर विकास आघाडी), ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी (शिवसेना), कल्पनाबाई अर्जुनराव शिंदे (अपक्ष), विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १४
निता देवराम ठुबे (शिवसेना), मयुरी नंदकुमार औटी (राष्ट्रवादी काँग्रेस)
अर्जांच्या छाणनीमध्ये एकही अर्ज बाद झाला नाही अथवा एकाही अर्जावर हरकत घेण्यात आली नाही. त्यामुळे विशेषतः प्रभाग ११ व प्रभाग १३ मध्ये अपक्षांचे काही अर्ज असून हे अर्ज मागे घेतले जाणार की तेथे बहुरंगी लढती होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रभाग क्र. २ मध्ये शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या तिन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर प्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना अशी सरळ लढत होत आहे. प्रभाग क्र. ११ मध्ये राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना या तिन प्रमुख पक्षांसह इतर पाच अर्ज आहेत तर प्रभाग १३ मध्ये अपक्षांचे दोन अर्ज आहेत. या दोन्ही प्रभागांबाबतच उत्सुकता आहे.