सार्वजनीक कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने ४० ते ४५ भाविकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही रूग्णांची प्रकृती स्थिर असली तरी काही रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
मावळ : पारनेर अपडेट मिडिया
मावळ तालुक्यातील पवन मावळ पसिरातील भडवली गावामध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. काकडा भजनाच्या कार्यक्रमाच्या समाप्तीनिमित्त भाविकासांठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रसाद घेतल्यानंतर भाविकांना उलटट्या, जुलाब, चक्कर येणे, मळमळ असा त्रास होऊ लागला. त त्रास होत असलेल्या रूग्णांना पवनानगर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता फुड पॉयझन मुळे हा प्रकार घडल्याची माहीती पुढे आली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार लॉकडाऊनमध्ये वापरात नसलेल्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आल्याने त्यातून हा प्रकार घडला असवा असे सांगितले जात आहे. परंतू त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही टाकी साफ न करताच त्यात पाणी भरण्यात आले होते व त्यातूनच विषबाधा झाली असावी अशीही माहीती पुढे आली आहे. दरम्यान, विषबाधा झालेल्या रूग्णांमध्ये ६ ते ७ लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
पवनानगर ग्रामिण रूग्णालयातील तिनही वार्ड विषबाधा झालेल्या रूग्णांनी भरले असून काही रूग्ण कान्हे फाटा येथील ग्रामिण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रकृती खालावलेल्या रूग्णांना औंध येथील रूग्णालयात हालविण्यात आल्याचे वैदयकिय सुत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेत ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्यात येत आहे. वडगांव मावळ व लोणावळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेेत.