पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शनिवारी पारनेर शहरातील मनकर्णीका लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात शिवसेना निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हा प्रमुख शशीकांत गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रक्रियेस देखील सुरूवात झाली आहे. लवकरच जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणूकांचीही घोषणा होणार आहे. या पार्श्वभुमिवर मंत्री शंकरराव गडाख व विजय औटी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या मेळाव्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. एकप्रकारे या मेळाव्याच्या निमित्ताने आगामी निवडणूकांचे रणशिंगच शिवसेनेच्या वतीने फुंकण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर जिल्हा परीषदेच्या बांधकाम व कृषी समितीच्या सभापतीपदाची संधी काशिनाथ दाते यांना मिळाल्यानंतर त्यांनी या पदाच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध भागात विकास कामे राबवून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. अनेक ठिकाणी पक्षाची फेरबांधणी करण्यात येऊन पक्षाची ताकद कायम ठेवण्यासाठीही प्रयत्न झाले आहेत. लवकरच होऊ घातलेल्या निवडणूकांमध्ये जि. प. च्या माध्यमातून राबविण्यात आलेली विकास कामे तसेच संघटनात्मक बांधणीच्या जोरावर बाजार समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आव्हान देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
विधानसभा निवडणूकांनंतर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शिवसेना नेत्यांचा शिवसैनिकांशी एकत्रीत संवाद झालेला नव्हता. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या मेळाव्यात विशेषतः विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शिवसैनिकांना काय संदेश देतात ? विरोधकांना काय आव्हान देतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमख विकास रोहोकले, युवा सेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, शहर प्रमुख नीेलेश खोडदे, महिला आघाडी शहर प्रमुख डॉ. वर्षा पुजारी, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुकाप्रमुख किसन सुपेकर, उपनगराध्यक्ष दत्ताशेठ कुलट, अनिकेत औटी, मा. जि. प. सभापती बाबासाहेब तांबे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख सुनिता मुळे,उपतालुकाप्रमुख संतोष येवले, ढवळपूरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, सुभाष सासवडे, संध्या शेळके, पंढरीनाथ उंडे, रामदास कावरे, सीमा भरत औटी, कोमल भंडारी, ताराबाई चौधरी, जयसिंग धोत्रे, बापूसाहेब साबळे, शुभम टेकूडे, युवराज पठारे, सुनिता निमसे, संदीप कोरडे, विजय डोळ, अमोल ठुबे, संदीप ठुबे, पशुराम फंड, गोरक्ष काळे, सखाराम उजगरे, दिपक उंडे, बाबाजी ठुबे, हरीषकाका दावभट, गुलाबराव नवले, रमेश वाजे, मंगेश सालके, अनिकेत देशमाने, सुरेश बोहृडे, अप्पासाहेब देशमुख, अर्जुन आढाव, दत्ता महांडूळे, बाबासाहेब नर्हे, राजू सासवडे, उमेश औटी, नरेश सोनवणे, महेश सालके, दत्ता खरमाळे, कैलास ढोमे, सुभाष रासकर, जालिंदर गुंजाळ, संभाजी थोरे, अक्षय गोरडे, देवराम मगर, अमोल रोकडे, विशाल गायकवाड, मुकेश गवळी, दत्ता वाडेकर, शेखर काशीद, भाउसाहेब रोकडे, नितिन परंडवाल, अंकुश ढोकळे, डॉ. सोमेश्वर आढाव यांच्या वतीने या मेळाव्यास शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.