parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

शिक्षकांचे जिल्हा परिषदेतील हेलपाटे अभिमानास्पद नाहीत! आ.डॉ.सुधीर तांबे यांनी टोचले कान !

Parner Update Media by Parner Update Media
September 28, 2021
in राजकीय, शैक्षणिक
0
शिक्षकांचे जिल्हा परिषदेतील हेलपाटे अभिमानास्पद नाहीत! आ.डॉ.सुधीर तांबे यांनी टोचले कान !

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

प्राथमिक शिक्षकांना वैयक्तिक कामाकरिता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा परिषदेत यावे लागणे ही बाब जिल्हा परिषदेच्या दृष्टिने निश्चित अभिमानास्पद नसल्याचे सांगत आ. डॉ. सुधिर तांबे यांनी प्रशासकिय यंत्रणेने प्रलंबित कामाचा निपटारा जलदगती करायला हवा असे कान टोचले आहेत !

शिरूर शहर प्राथमिक शिक्षक मित्र मंडळ व पा रनेरकर सामाजिक विकास संस्था यांच्या विद्यमाने शिरूर येथे गुणवंत शिक्षक गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले गुरूजी तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे होते. व्यासपीठावर शिक्षक बँकेचे संचालक आविनाश निंभोरे, विस्ताराधिकारी राजेंद्र पवार , भाऊसाहेब डेरे , उपाध्यक्ष संजय शेळके, गुरुमाऊली मंडळाची जिल्हा अध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे सुनील दुधाडे संतोष खामकर बाबा धरम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले, प्राथमिक शिक्षकांना वैयक्तिक कामाकरिता जिल्ह्याच्या कानाकोप-यातून जिल्हा परिषदेत यावे लागणे हि बाब जिल्हा परिषदेच्या दृष्टिने निश्चित अभिमानास्पद नाही.त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेने प्रलंबित कामाचा निपटारा जलदगती करायला हवा. शिरूर शहरात राहणारा अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक येथे राहून देखील एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन एकमेकांना आधार देण्याचे काम करत आहे. समाजाला दिशादर्शक अशा कामातून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्याबरोबर मी कार्यरत असून तुमच्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका भविष्यामध्ये सरकारकडून घेतली जाईल. राज्यातील शाळा सुरू करणे बाबत संघटनेने घेतलेली भूमिका सकारात्मक असून याबाबत सरकारने गांभिर्याने विचार करायला हवा. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे अभिवचन यावेळेस डॉ.तांबे यांनी दिले.

रावसाहेब रोहोकले यांनी बोलताना सांगीतले की, सेवानिवृत्ती नंतरही आपण डॉक्टर सुधीर तांबे यांसारख्या माणसांकडून काम कसे करावे याबाबत शिकवण घेत आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र पोटे, तुकाराम आडसुळ, रामदास नरसाळे, शोभा कोकाटे यांचा तसेच सलाम बॉम्बे या संस्थेमार्फत राज्यामध्ये पाचव्या क्रमांकाने गौरविण्यात आलेल्या व्यसनमुक्तीच्या शॉर्ट फिल्म मधील कलाकार परशुराम सोंडकर, बाळू तरटे,संजय शिर्के, छगन चेडे, हरी साळुंखे, शॉर्ट फिल्मचे निर्माते ओंकार पोटे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त शिक्षक अनुक्रमे शोभा लाळगे संतोष साबळे, श्रीमती संगीता भदे यांना डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर इंगळे तर आभार श्री.रासकर यांनी मानले. कार्यक्रमास शिरूर शहरातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्र गैरसोयीची

सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेली खाती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडण्याबाबत राज्यस्तरावरून आदेशित केले असून हे शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी प्रास्ताविकामध्ये केली. या मागणीची तात्काळ दखल घेऊन डॉक्टर तांबे यांनी मंगळवारी मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या समवेत बोलून सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

Previous Post

शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !

Next Post

पुरात वाहून गेली एसटी बस

Next Post
विज चोरी पकडणाऱ्या वायरमनला चपलेने बदाडले !

पुरात वाहून गेली एसटी बस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारनेरला बाजार समितीत कांदा ४४ रूपये किलो ! दसऱ्यानंतर आणखी तेजी ?

शेतकऱ्यांना चिंता ! अखेर अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल !

October 18, 2021
आयसीयू ८ टक्के, तर व्हेंटिलेटर ७ टक्के बेड शिल्लक !

ही आहे सोमवारची करोना रुग्ण संख्या 

October 18, 2021
शिवसेनेला रामदास कदम यांचे आव्हान ?

शिवसेनेला रामदास कदम यांचे आव्हान ?

October 18, 2021
पारनेर बाजार समितीचा राज्यासह परराज्यात नावलौकिक : शेळके

पारनेर बाजार समितीचा राज्यासह परराज्यात नावलौकिक : शेळके

October 18, 2021
पारनेरमध्ये लोकसहभागातून साकारतेय ‘ग्रीन टनेल’

पारनेरमध्ये लोकसहभागातून साकारतेय ‘ग्रीन टनेल’

October 18, 2021
कांद्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ !

महाराष्ट्रातील सोमवारचे कांद्याचे बाजरभाव

October 18, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali