पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसहाययीत रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी शिवसेनेचे जि. चे बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते तसेच तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी उपोषणचा इशारा देताच ती कामे सुरू करण्यात आली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी दाते व रोहकले यांना दिले आहे.
जामगांव ते सारोळा आडवाई, धोत्रे खुर्द, जामगांव साठे वस्ती लोणीहेवली रस्ता, या रस्त्यांची कामे राज्य सरकारने एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मंजुर झालेली आहेत. ही कामे विधानसभेचे तत्कालीन उपसभापती विजय औटी यांच्या शिफारशीतून त्यांच्याच प्रयत्ना मंजुर झालेली असल्याचे दाते व रोहकले यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
दि. २९ जुन २०२१ रोजी या कामांना कार्यारंभ आदेश मिळाले असून दोन महिन्यांचा कालावधी होऊनही ही कामे सुरू झालेली नाहीत. दळणवळणाच्या दृष्टीने ही कामे सुरू होण अत्यंत महत्वाचे आहे. ही कामे सुरू न झाल्यास येत्या २७ तारखेपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
उपोषणाचा इशारा देताच मावळेवाडी ते घावटेवाडी, धोत्रे खुर्द रस्ता व हनुमानवाडी रस्त्याचे काम सुरू झाले असून उर्वरीत ३ कामे येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल असे लेखी अश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने आंदोलन स्तगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणूकीच्या पराभवानंतर मा. आ. विजय औटी यांनी ही कामे मंजुर झाल्यानंतर त्यांचे भुमिपजन केले होते. त्यावेळी या कामात कोणी अडथळा आणू नये कोणी आणला तर मी सर्वांचा बाप आहे अशी टीकाही केली होती. या पार्श्वभुमिवर या ही कामे रेंगाळली होती. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर ती सुरू करण्याचे लेखी अश्वासन देण्यात आले.