parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

१५ लाखांची खंडणी : माजी उपसरपंच, पत्रकारासह ९ जणांविरुद्ध गुन्हा

Parner Update Media by Parner Update Media
September 15, 2021
in गुन्हे
0
आजी आजोबांवर नातवांनी केले कोयत्याने वार : दोघेही गंभीर जखमी

चाकण : पारनेर अपडेट मिडिया

एका महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनमध्ये पाठवून प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकण(ता.खेड जि.पुणे) मध्ये उघडकीस आली आहे.

एका नगरसेवकाने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर सोमवारी (दि.१३ ) चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकारासह दोघांना अटक

तक्रारदाराने या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉटसअप चॅटिंग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (रा. वैशाली कॉम्प्लेक्स , चाकण, ता. खेड ) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड,  कुणाल राऊत, प्रणीत नामक एक इसम आणि चाकणमधील एक पत्रकार अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

कुणाल राऊत आणि एका पत्रकारास सोमवारी रात्रीच पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. खंडणीची ही संपूर्ण घटना ४ सप्टेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२१ दरम्यान आंबेठाण चौक येथील वैशाली कॉम्प्लेक्स मध्ये घडली असल्याचे पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नगरसेवक शेवकरी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वरील सर्व आरोपींनी व इतर सक्रीय टोळीने संगनमताने बदनामी करण्याच्या उद्देशाने सलोनी नामक महिलेस वारंवार पोलीस ठाण्यात पाठवून नगरसेवक शेवकरी यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते.

पैशांच्या मागणीचे व्हॉटसअप चॅटिंग

दरम्यानच्या काळात हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल करून सुरुवातीला १५ लाखांची मागणी केली. नंतर तडजोड करून १२ लाख किंवा ५ लाख रुपये व सलोनी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली. पैशांची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक शेवकरी यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. त्याच प्रमाणे पैशांच्या मागणीचे व्हॉटसअप चॅटिंग देखील समोर आले आहे.

या घटनेने चाकण शहरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत. पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

‘वर्षा’ पेक्षा ‘सागर’ बंगल्यातच अधिक खुष : अमृता फडणवीस

Next Post

पेट्रोलचे दर निम्म्याने कमी होणार ?

Next Post
पेट्रोलचे दर निम्म्याने कमी होणार ?

पेट्रोलचे दर निम्म्याने कमी होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आक्रमक किरीट सोमय्यांचा पारनेर दौरा ठरला वांझोटा !

आक्रमक किरीट सोमय्यांचा पारनेर दौरा ठरला वांझोटा !

September 23, 2021
पवार व ठाकरे डाकू प्रवृत्तीचे ! महाराष्ट्रात हाहाःकार !

पवार व ठाकरे डाकू प्रवृत्तीचे ! महाराष्ट्रात हाहाःकार !

September 23, 2021
सोमय्यांचा आज दौरा : पारनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त

सोमय्यांचा आज दौरा : पारनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त

September 23, 2021
समाजातील सर्व घटकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशिल : आमदार  लंके

मंत्र्यांच्या हस्ते प्रोटोकॉल प्रमाणे होणार त्या रस्त्यांचे भुमिपुजन : आ. लंके यांचे दाते, रोहोकले यांना प्रत्युत्तर

September 22, 2021
जरे हत्याकांड : “माने म्हणतात, हल्ला झाला त्यावेळी माझा फोन चालू होता !”

बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला !

September 22, 2021
शिवसेनेने उपोषणाचा इशारा देताच रस्त्यांची काम सुरू !

शिवसेनेने उपोषणाचा इशारा देताच रस्त्यांची काम सुरू !

September 22, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali