पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पिकअपचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी शिवारात हा अपघात झाला. वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या बैल गाडा शर्यती पाहून परतताना हा अपघात झाला. अपघातातील मयत तरुण पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील तरुण असून आकाश राजेंद्र लोणकर असे त्याचे नाव आहे.
बेल्हे – जेजुरी मार्गावर लोणी धामणी शिवारात पिकअपचा टायर फुटला. पिकअप गाडीमधून एकूण १५ ते १६ तरुण प्रवास करीत होते. ते सर्वजण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील नानोली येथे गेले होते. शर्यतीहून परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातातील जखमी शिरापूर परिसरातील पिंपरखेड, चोंभुत भागातील असून त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील मंचर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.