पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
राज्यातील लाखो भाविकांचे देवस्थान असलेल्या जातेगाव येथील श्री. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बिनविरोध निवड झाली.
बुधवारी पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुनीता विठ्ठल पोटघन, उपाध्यक्षपदासाठी निर्मला कळमकर, कार्याध्यक्षपदासाठी स्नेहल संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार जगताप, सचिवपदी सचिन ढोरमले, सहसचिवपदासाठी गणेश वाखारे, खजिनदारपदासाठी शिवराम पोटघन यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने तीनही निवडी बिनविरोध झाल्या.
विश्वस्त मंडळात शिवसेनेचे काही सदस्य असून त्यांनी अध्यक्षपदासाठी लॉबिंग केले होते. मात्र त्यांना कोणाचीही साथ न लाभल्याने सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.
यावेळी विश्वस्त शिवसेनेचे पंचायत समिती सभापती गणेश शेळके, नारायनगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोहृडे,सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ढोरमले, शिवाजीराजे भगत, रुपाली पोटघन,सोनाली ढोरमले, सविता ढोरमले, जयसिंग धोत्रे, विशाल फटांगगडे हे उपस्थित होते.
नवे पदाधिकारी व विश्वस्त यांचे आमदार नीलेश लंके यांनी अभिनंदन केले.