नाशिक : पारनेर अपडेट मिडिया
उन्हाळ कांद्याचे (summer onion price) भाव एका दिवसात किलोला १० रुपयांनी कोसळले. सोमवारी (ता ४) ४० ते ४२ रुपये किलो या भावाने कांदा विकला गेला. भाववाढ झाल्याने कांदा निर्यातबंदीची (Onion export) टांगती तलवार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये (onion traders) चलबिचल सुरू आहे. हेच कारण कांद्याचे भाव कोसळण्यास कारणीभूत आहेत. अजूनही २५ ते ३० टक्के उन्हाळ कांदा जिल्ह्यात शिल्लक आहे.
कांदा निर्यातबंदीची टांगती तलवार
व्यापाऱ्यांमध्ये चलबिचलपाकिस्तान सरकार (pakistan) कांद्याच्या निर्यातबंदीचा विचार करत असल्याने तेथील फळ व भाजीपाला निर्यातदार-आयातदार आणि व्यापाऱ्यांच्या संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यातच, भारतातर्फे निर्यातबंदीचा विचार होऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली. दक्षिणसोबत राजस्थानमधील (onion news) कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याने देशांतर्गत नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा भाव किलोला ४० ते ४२ रुपयांपर्यंत भिडला होता. सोमवारी (ता. ४) भारतातर्फे निर्यातबंदीचा विचार होऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली.
निर्यातदारांच्या नजरा केंद्र सरकारच्या बैठकीकडे२०१९ आणि २०२० मध्ये सप्टेंबरमध्ये कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने केली होती. २०१९ ची निर्यातबंदी मार्च २०२० मध्ये, तर गेल्या वर्षीची निर्यातबंदी जानेवारी २०२१ मध्ये उठविण्यात आली होती. नेमका हा अनुभव जमेस असल्याने निर्यातदारांच्या नजरा केंद्र सरकारच्या या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे खिळल्या आहेत