सुपा : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी सुपा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुणे विभागाचे संचालक दिनकर टेमकर व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस पारनेरचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे उपस्थित होते . शाळेच्या पहिल्या दिवसाच्या स्वागत सोहळ्यात मुलांना नवीन पाठ्यपुस्तक वाटप करून प्रत्येक मुलाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी वेळ वाया जाणार नाही. ऑनलाईन अभ्यास करताना बरेच विद्यार्थी अभ्यासा पासून वंचित राहत होते. काहींना मोबाईल नव्हते तर काही विद्यार्थ्यांना रेंज नव्हती तर काहींना मोबाईल मध्ये बॅलन्स टाकण्यास पैसे नव्हते अशा अडचणी येत होत्या परंतु आत्ता ह्या अडचणी मुलांच्या दूर झाल्या यावेळी संचालक दिनकर टेमकर साहेबांनी मुलांना शाळा शाळा सुरू झाल्यावर तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारला त्यावेळी मुलांनी आम्हाला शाळा चालू झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. आमच्या मित्रांची बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती . आता होणार आहे .आम्ही घरी खूप कंटाळलो होतो. आमचा अभ्यास पण ऑनलाईनने होत नव्हता. आता शाळा चालू झाल्यामुळे आमचा अभ्यास चांगला होईल. मुलांना दुसरा प्रश्न विचारला शाळा बंद का होत्या तर मुलांनी covid-19 हा विषाणू आल्यामुळे शाळा बंद होत्या कोरोना रोगापासून संरक्षण व्हावे गर्दी होऊ नये म्हणून शाळा बंद होत्या. पुढचा प्रश्न विचारला आता शाळा चालू झाली तुम्ही शाळेत काय दक्षता घ्याल तर मुलांनी सांगितले तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्स ठेवू सॅनिटायझरचा वापर करू. घरी गेल्यानंतर स्वच्छ आंघोळ करू कपडे बदलू पुढचा प्रश्न विचारला मास्क लावण्याचा काय फायदा होतो. मुलांनी उत्तर दिले आपल्यामुळे विषाणूचा पुढच्याला त्याचा त्रास होत नाही .आणि आपल्याला पण त्रास होत नाही. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चार विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच पुणे विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी नवोदय मध्ये ग्रामीण भागातील मुलांची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा स्तर उंचावला आहे असे गौरवोद्गागार काढले तसेच कोरोनाची भीती न बाळगता सर्व नियम पाळत काळजी घेत शिक्षण देण्या- घेण्याचे आवाहन केले.
द्विशिक्षिकी शाळा आणि ९१ पट झाल्यामुळे गेल्या वर्षी पाचवीचा वर्ग सुरु केला परंतु वर्गाची अडचण होती ती अडचण शरद आबा पवार यांनी सोडवली ह्या वर्षी सहावीचा वर्ग चालु केल्यामुळे पुन्हा एका वर्गाची अडचण झाली ती ग्रामपंचायत सदस्य दत्ताशेठ पवार यांनी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळ्के यांच्या माध्यमातून पुर्ण करुन देण्याची जबाबदारी घेतली. द्विशिक्षकी शाळा असून महिला मुख्याध्यापिका ज्योती साबळे यांनी लाॅकडाऊन मध्ये हि शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेतली. यामुळेच गुणवत्तेत पवारवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी चमकले असल्याचे मत अध्यक्ष स्थानांवरुन अहमदनगर माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी व्यक्त केले. पंचायत समिती पारनेर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी मार्गदर्शन करताना ऑन लाईन ऑफलाईन
अभ्यास देखील परीणाम कारक ठरला. वस्ती शाळा असून पाचवी सहावी चा वर्ग सुरु करुन महिला शिक्षिकेने मोठी जबाबदारी पेलवत तालुक्यात गुणवत्ता सिद्ध केली हि गोष्ट तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे असे शिक्षकच खर्या अर्थाने पुरस्कारासाठी पात्र ठरतात. यावेळी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारे चार विद्यार्थ्यांचा सन्मान व NTS मध्ये निवड झालेला व तबला विशारद वेदांत गायकवाड व नवोदयच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका ज्योती साबळे यांचा सत्कार संचालक दिनकर टेमकर यांनी करुन पुढील शिक्षणासाठी व शाळेची गुणवत्ता अशीच टिकवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी पंचायत समिती विषय तज्ञ सुरेश सोनवणे, सुपा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पवार, शरद पवार , हेमलता पवार , दिपक शेठ पवा, प्रविण सुपेकर , जय पवार शाळा समितीचे अध्यक्ष छगन पठारे, सुकदेव पवारशेठ ,शिवाजी पवार , महेश पवार मुख्याध्यापिका ज्योती साबळे सहशिक्षिका वर्षा साठे, अंगणवाडी सेविका आशा पवार व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सुत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक सचिन परांडे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख अविनाश गांगर्डे यांनी मानले.